दिंडे (dinde recipe in marathi)

Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037

#shravanqueen
#post2
#cooksnap
#supriyavartakmohite
मी आज सुप्रिया वर्तक मोहिते यांची दिंडे रेसिपी करून पाहिली, चवीला खूपच छान झाली.

दिंडे (dinde recipe in marathi)

#shravanqueen
#post2
#cooksnap
#supriyavartakmohite
मी आज सुप्रिया वर्तक मोहिते यांची दिंडे रेसिपी करून पाहिली, चवीला खूपच छान झाली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. सारणासाठी :
  2. २०० ग्राम चणाडाळ (१ कप)
  3. २०० ग्राम गुळ (१ कप)
  4. 1 टेबल स्पूनसाखर
  5. 1 टिस्पून वेलचीपूड
  6. 1 टिस्पून सुंठपुड
  7. 1/2 टिस्पून मीठ
  8. पारीसाठी :
  9. 2 टेबल स्पूनतूप
  10. 1 कपगव्हाचे पिठ
  11. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

  1. 1

    चणाडाळ स्वच्छ धुवून डब्यात चणाडाळीत पाणी घालून कुकरमध्ये ७ शिट्ट्या करून शिजवून घ्या. कुकर थंड झाला की गाळणीने चणाडाळ गाळून घ्या. चणाडाळ घेऊन ती स्मॅशरने स्मॅश करून घ्या. नंतर त्यात गूळ, साखर घाला.

  2. 2

    एकजीव करून ५-७ मिनिटे शिजवून मग त्यात वेलचीपूड, सुंठपुड घाला. परत एकजीव करा, हे झाले सारण तयार.

  3. 3

    गव्हाच्या पिठात मीठ,हळद व गरम तूप घालून हाताने चोळून घ्या. नंतर पाणी घालून घट्ट मळा. त्या मळलेल्या पिठावर तूप लावून झाकण ठेवून १५-२० मिनिटे बाजूला ठेवा.

  4. 4

    पीठ मळून त्याचे गोळे करा. पातळ पोळी लाटा त्यावर आणि चोकोनी तुकडे करून त्यात सारण भरून बाजूने कडेने नागमोडी आकार द्या

  5. 5

    गॅसवर भांड्यात पाणी गरम करा त्यावर चाळणीला तूप लावून चाळण ठेवा. त्यावर तयार दिंडे ठेवा. १५ मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्या. बाहेर काढून गरमागरम दिंडे वरून तूप अगदी सढळ हाताने घालून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Dhanashree Suki Padte
Dhanashree Suki Padte @cook_21625037
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes