दिंडे (dinde recipe in marathi)

Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786

#shravanqueen #cooksnap मी सुप्रिया मोहिते ताई यांची दिंडे ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.माझ्यासाठी ही रेसिपी नवीनच आणि नाव सुद्धा पहिल्यांदाच ऐकलेलं. पहिल्यांदाच केली पण खरच खूप छान झाली आणि घरी सुद्धा सगळ्यांनाच आवडली. चला तर मग बघुया दिंडे कसे करतात तर😊

दिंडे (dinde recipe in marathi)

#shravanqueen #cooksnap मी सुप्रिया मोहिते ताई यांची दिंडे ही रेसिपी कूकस्नॅप केलेली आहे.माझ्यासाठी ही रेसिपी नवीनच आणि नाव सुद्धा पहिल्यांदाच ऐकलेलं. पहिल्यांदाच केली पण खरच खूप छान झाली आणि घरी सुद्धा सगळ्यांनाच आवडली. चला तर मग बघुया दिंडे कसे करतात तर😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40/45 मिनिटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीचणाडाळ
  2. 1 वाटीगव्हाचे पीठ
  3. 1 वाटीगुळ
  4. 2 टेबल्स्पूनसाखर
  5. 2 टेबलस्पूनतेल
  6. 1/2 टीस्पूनजायफळ पावडर
  7. 1/2 टीस्पूनवेलची पावडर

कुकिंग सूचना

40/45 मिनिटे
  1. 1

    सर्वात आधी चणा डाळीला रात्रभर भिजवून घेतले.त्यानंतर सकाळी त्यातलं पाणी काढून परत स्वच्छ धुऊन त्यात पाणी व चिमूटभर हळद टाकून कुकरमध्ये तीन शिट्या होऊ दिल्या. डाळ छान शिजली की त्यामध्ये राहिलेले पाणी चाळणीने गाळून कढईमध्ये काढून डाळीला स्मॅशरने स्मॅश करून घ्यावे.

  2. 2

    त्यानंतर त्या डाळीमध्ये किसलेला गूळ, दोन चमचे साखर, चिमुटभर मीठ, वेलची, जायफळ पावडर टाकून त्याचे पुरण तयार करून घ्यावे. तिकडे आपले पुरण तयार होईपर्यंत कणीक घेऊन त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून त्याचे दोन प्रकारचे गोळे तयार करून घ्यावेत. एका गोळ्यांमध्ये मी ऑरेंज कलर चा फूड कलर टाकलेला आहे. तुम्ही आपल्या मनाप्रमाणे कोणत्याही कलरचे फुड कलर टाकू शकता किंवा साधे ही करू शकता.

  3. 3

    आता लिंबाएवढे गोळे करून त्याची पाती लाटून घ्यावी व त्यामध्ये पुरणाचे सारण भरून चारही बाजूंनी पॅक करून घ्यावेत.

  4. 4

    वरीलप्रमाणेच ऑरेंज कलर च्या गोळ्याचे ही तसेच करून घ्यावे. आपल्याला जर दिंड्या वर डिझाईन म्हणून काही द्यावस वाटलं तर काटा चमच्याने थोड थोड प्रेस करून घ्यावे.ज्याप्रमाणे चित्रात दाखवलेल आहे. अशाच प्रकारे बाकीचे दिंडे तयार करून घ्यावेत.

  5. 5

    आता स्टीमर मध्ये खालती दीड कप पाणी उकळायला ठेवून द्यावे. व चाळणीला तेल लावावे. त्या चाळणीत हे तयार केलेले दिंडे ठेवावे. पाणी उकळलं की ही चाळणी त्या स्टीमरवर ठेवून त्यावर झाकण ठेवून मिडीयम आचेवर 20 मिनिट दिंडे वाफेवर शिजू द्यावेत. तुम्ही इडलीपात्र किंवा ज्यावर ही चाळणी व्यवस्थित बसत असेल त्या भांड्यात सुद्धा हे दिंडे वाफेवर शिजवू शकता.

  6. 6

    आता आपले दिंडे खाण्यासाठी तयार आहेत. तेव्हा देवाला नैवेद्य दाखवून श्रीकृष्णार्पण म्हणून खायला घ्यावेत. तेव्हा मैत्रिणींनो करून बघा आणि सांगा तुम्हाला दिंडे कसे वाटले....🙏😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shweta Amle
Shweta Amle @cook_22142786
रोजी

Similar Recipes