काकडीचं सांदण (Kakdich Sandan Recipe In Marathi)

Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
Kalyan West.

#रेसिपीबुक #week8
#नारळी पौर्णिमा
हिंदू संस्कृतीनुसार नारळी पौर्णिमेला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधून भावास दिर्घ आयुष्य व सुख लाभो मिळो म्हणुन प्रार्थना करतात. पुरातन काळात, जेव्हा स्त्री स्वतःस असुरक्षीत जाणते, तेव्हा ती अशा व्यक्तीस राखी बांधून भाऊ मानते, जो तिची रक्षा करील.

अशा वेळेस सणाला आणि भावासाठी गोडधोड काही तरी केलेच पाहिजे.

आज आपण बघूया काकडीचं / तवसाचं सांदण.

पावसाळ्यात हिरव्या सालीच्या काकड्या मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. ह्याला तवसा असंही म्हंटलं जातं. ह्याच काकड्यांपासून आपण बघूया काकडीचं सांदण.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
  1. 1 कपहिरव्या काकड्यांचा किस
  2. 1/2 कपगूळ
  3. 1/2 कपखवलेलं खोबरं
  4. 1/2 कपइडली रवा
  5. 1 टीस्पून वेलची पूड
  6. तुकडेकाजू आणि बदामाचे
  7. 1 टीस्पून साजूक तूप

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    ह्याप्रमाणे मिळणाऱ्या हिरव्या काकड्याच वापराव्यात.

  2. 2

    प्रथम काकडी सोलून आणि किसून घ्यावी. एका बाउल मध्ये काकडीचा किस आणि गूळ घ्यावा. ५-७ मिनिटे ढवळून गूळ विरघळवुन घ्यावा.
    गूळ विरघळला कि त्यात खवलेलं खोबरं घालून नीट एकत्र करून साईड ला ठेवून द्या.

  3. 3

    आता एका पॅन किंवा कढई मध्ये तूप घेऊन त्यावर इडली रवा ५ मिनिटे भाजून घेणे. भाजून घेतलेला रवा पूर्ण थंड होऊ द्या.

  4. 4

    भाजून थंड करून घेतलेला रवा आता काकडी, गूळ आणि खोबऱ्याच्या मिश्रणात घालून त्यात काजू आणि बदामाचे तुकडे आणि वेलची पूड घालून नीट एकत्र करून घ्या. तयार मिश्रण १ तास झाकून मुरायला ठेवून द्या.

  5. 5

    एका तास नंतर रवा छान मुरून फुलला आहे.

  6. 6

    आता केक टिन ला तूप लावून त्यात तयार मिश्रण पसरून घालावे. (केक टिन नसल्यास कुकर चा डब्बा घेऊ शकता).

  7. 7

    गॅसवर स्टीमर मध्ये खाली थोडे पाणी घालून वर झाली अथवा ताटली ठेवून त्यावर केक टिन ठेवावा.
    झाकण ठेवून माध्यम आचेवर २०-२५ मिनिटे सांदण मिश्रण वाफवून घ्यावे.

  8. 8

    २०-२५ मिनिटे वाफवून घेतल्यावर गॅस बंद करून दोन मिनिटांनी तयार सांदण बाहेर काढून पूर्ण थंड होऊ द्यावे,
    सांदण थंड झाले कि मग सुरीने साईडच्या कडा मोकळ्या करून एका प्लेट मध्ये सांदण काढून घ्यावे. आणि त्याच्या वड्या पाडून घ्याव्यात.

    सांदण खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Samarpita Patwardhan
Samarpita Patwardhan @cook_22384179
रोजी
Kalyan West.

टिप्पण्या

Similar Recipes