पिकलेल्या पपईचा केक / सांदण  (sandan recipe in marathi)

Modak Pallavi
Modak Pallavi @PAvill

#gur
हा पपईचा केक पौष्टीक आहे. जेव्हां लहान मुले केक साठी हट्ट करतील तेव्हां याप्रकारचा केक करू शकता . पपई आपल्या आरोग्यासाठी चांगली असते. हा पदार्थ लहानां पासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडण्या सारखा आहे. सध्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा पदार्थ नैवैद्यासाठी सुद्धा करू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ १/२ तास
५-६ जणांसाठी
  1. ४०० ग्रॅम इडली रवा किंवा. ४०० ग्रॅम गव्हाचा रवा
  2. 1 मोठा चमचावेलची पावडर
  3. ४०० ग्रॅम किसलेला गूळ
  4. 4 चमचेतूप
  5. 1 लहानओला नारळ खोवलेला
  6. 1-1/2 चमचाबेकिंग पावडर
  7. चिमूटभरमीठ
  8. 1मोठी पिकलेली पपई
  9. 1 वाटीकाजू बेदाणे

कुकिंग सूचना

१ १/२ तास
  1. 1

    प्रथम इडली रवा कढई मध्ये २ मोठे चमचे तूप घालून खमंग भाजून घ्या. आता तो रवा थंड करायला ठेवा. मिक्सर मध्ये पपईचा गर काढून वाटून घ्या. एका भांड्यात रवा, पपईचा गर, ओले खोबरे, मीठ, गूळ घालून नीट मिसळून २ तास झाकून ठेवा. दोन तासांनी हे मिश्रण नीट मिसळून घ्या. यामध्ये १ मोठा चमचा वेलची पावडर, बेकिंग पावडर, काजू बेदाणे घालून मिसळून घ्या. कुकर मध्ये प्लेट ठेऊन पाणी घाला. कुकरच्या मोठ्या भांड्याला सगळ्या बाजूंनी तूप लावून घ्या. आता यामध्ये मिश्रण घाला. आता हे भांडे कुकर मध्ये ठेवा. शिट्टी बाजूला काढा.आणि

  2. 2

    झाकण लावा. मध्यम आचेवर गॅस वर शिजायला ठेवा. हा केक शिजण्यासाठी १ १/२ तास लागतो. शिजला आहे का पहाण्यासाठी सुरी घालून पहा. मिश्रण चिकटत असेल तर काही वेळ शिजू द्या. जर सुरीला मिश्रण चिकटत नसेल तर गॅस बंद करा. हे कुकर चे भांडे बाहेर काढा. थंड झाल्यावर वर एक ताट ठेऊन उपडे करा. भांड्याला तूप लावल्यामुळे केक छान सुटतो. आता आवडतात त्या प्रमाणे तुकडे करून सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Modak Pallavi
रोजी

Similar Recipes