ओल्या खोबऱ्याची वडी (बर्फी) (olya khobryachi vadi recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#rbr श्रावण शेफवीक२ श्रावण पौर्णिमेला दरवर्षी रक्षाबंधन साजरा केला जातो. रक्षाबंधन म्हणजेच संरक्षाचे बंधन( राखी म्हणजेच रक्षण कर) बहिण भावाच्या प्रेम व कर्तव्याचा उत्सव बहिण भावाच्या मनगटावर राखी बांधुन त्या बदल्यात त्याच्या बहिणीची काळजी घेण्याची शपथ घेतो. तील भेट वस्तू देतो. प्रेम, पराक्रम, सय्यम, वासल्य, निस्वार्थ प्रेमाची व्याख्या म्हणजेच भावा बहिणीचे प्रेम आपल्या देशात हा सण वेगवेगळ्या नावाने कजरी पौर्णिमा, नारळी पौर्णिमा या नावाने साजरा केला जातो.
मी आज माझ्या लाडक्या भावासाठी रक्षाबंधनाच्या निमित्ताने त्याला आवडणारी खोबऱ्याची वडी केली आहे चला तुम्हाला पण रेसिपी दाखवते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-४ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम साखर (कमी जास्त करता येईल)
  2. ५० ग्रॅम दुधावरील मलई
  3. २५ ग्रॅम मिल्क पावडर
  4. 1-2 टेबलस्पुनपिस्ता काप
  5. २०० ग्रॅम खोवलेला ओला नारळ
  6. 1 टीस्पूनसाजुक तुप

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    ओल्या खोबऱ्याची वडी बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य काढुन ठेवा नारळ फोडून खोवुन घेतला त्यामुळे वड्या मऊसुत पांढर्या शुभ्र बनतात

  2. 2

    जाड बुडाच्या पॅनमध्ये ओले खोवलेले खोबरे, साखर, मिल्क पावडर मिक्स करा

  3. 3

    नंतर त्यात दुधावरील मलई मिक्स करा

  4. 4

    सर्व मिश्रण एकत्र मिक्स करून गॅस वर पॅन ठेवुन सतत परतत रहा

  5. 5

    शेवटी मिश्रण परतत घट्ट होत जाईल व त्याचा गोळा तयार होईल

  6. 6

    स्टिलच्या प्लेटला तुप लावुन त्यावर वरील मिश्रण त्यात पसरवुन थंड करा व वड्या पाडा

  7. 7

    तयार खोबऱ्याच्या वड्या स्टिल प्लेट मध्ये व नारळाच्या करवंटीत ठेवुन वरून पिस्ता कापांनी डेकोरेट करून सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (3)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद सुप्रिया, जास्मिन🙏🙏

Similar Recipes