व्हँनीला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#noovenbaking #post-4 नेहा शाह यांनी शीकवलेली कूकीज आज मी बनवली खूपच सूंदर आणी टेस्ट पण खूप सूंदर होती ...धन्यवाद नेहा मँम खूपच सूंदर रेसीपी होती ...घरी सगळ्यांना खूप आवडले....

व्हँनीला हार्ट कूकीज (vanilla heart cookies recipe in marathi)

#noovenbaking #post-4 नेहा शाह यांनी शीकवलेली कूकीज आज मी बनवली खूपच सूंदर आणी टेस्ट पण खूप सूंदर होती ...धन्यवाद नेहा मँम खूपच सूंदर रेसीपी होती ...घरी सगळ्यांना खूप आवडले....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
4 सर्व्हिंग्ज
  1. 1/4 कपबटर
  2. 1/2 कपपिठीसाखर
  3. 1/4 टीस्पूनव्हनीला इसेंस
  4. 2-3 टीस्पूनदूध
  5. 6-7 थेंबरेड फूड कलर
  6. 3/4 कपमैदा
  7. 1/8 टीस्पूनबेकींग पावडर
  8. बटर पेपर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    प्रथम सगळी तयारी करू...आणी एका बाऊलमध्ये बटर,साखर,वेनीला इसेंस छान मीक्स करून घेणे...

  2. 2

    नंतर त्यात मैदा टाकून तो पण मीक्स करणे...नंतर त्याचे दोन भाग करणे नंतर दोन्ही भागात बेकींग पावडर टाकणे...एकात लाल फूडकलर टाकणे आणी थोड दूध टाकून भीजवणे...दूसरा भाग दूध टाकून भीजवणे आणी पांढराच ठेवणे...

  3. 3

    आता लालभाग बटर पेपर वर ठेवून लाटणे आणी हार्ट शेप कूकी कटरने कूकी कट करणे आणी पत्येक हार्ट शेपवर पाण्याचा ब्रश फीरवून एकावर एक ठेवून अरेंज करणे...

  4. 4

    आणी बटर पेपरमध्ये गूंडाळून ते फ्रीजर मधे 20 मींट ठेवणे...नंतर फ्रीजमधून काढून पेपर काढणे आणी त्यावर पांढरा बँटरचा भाग व्यवस्थित हार्ट शेपवर लपेटणे....

  5. 5

    सगळीकडून व्यवस्थित लपेटून गोल सीलेंडर प्रमाणे गूंडाळणे आणी परत बटर पेपर मधे गूंडाळून 20 मींटा साठी फ्रीजर मधे ठेवणे....

  6. 6

    नंतर पँनमधे खाली मीठ टाकून एक स्टँड ठेवणे आणी गँसवर 8-9 मींट प्रिहीट करायला ठेवणे...आणी फ्रीजर मधून कूकी सीलेंडर काढून घेणे कागद काढून कूकी कट करून घेणे...

  7. 7

    आता ट्रे मधे बटर पेपर ठेवून त्यावर कूकीज थोड थोड अंतर ठेवून सेट करणे नी प्रिहीट कढईत 20 ते 25 मींट लो फ्लेम वर बेक करणे...नंतर काढून थंड करणे..

  8. 8

    खाण्यास तयार व्हँनीला हार्ट कूकीज...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes