गाजराची कोशिंबीर,कोबीची,फरसबीची भाजी (gajar koshimbir,kobichi-farasbichi bhaji recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#तिरंगा
Post 1
कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व,वेगळेपण,अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं. तिरंगा हे नाव ऐकल्यावरच देशभक्तीचे एक स्फुरण चढते. कूकपॅडवर माझ्या छप्पन रेसिपीज् पूर्ण झाल्या आणि कूकपॅडच्या साप्ताहिक थीमसाठी माझ्या रेसिपीला पहिले बक्षीस मिळाले. त्यामुळे ठरवलं तिरंगा थीमसाठी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ काहीतरी पौष्टिक बनवायचं. आज मी गाजराची कोशिंबीर, फरसबीची भाजी आणि कोबीची भाजी बनवली.

गाजराची कोशिंबीर,कोबीची,फरसबीची भाजी (gajar koshimbir,kobichi-farasbichi bhaji recipe in marathi)

#तिरंगा
Post 1
कोणत्याही राष्ट्राचा ध्वज हा त्याचं सार्वभौमत्व,वेगळेपण,अस्तित्व आणि समृद्ध वारशाचा अभिमान दाखवणारं प्रतीक असतं. तिरंगा हे नाव ऐकल्यावरच देशभक्तीचे एक स्फुरण चढते. कूकपॅडवर माझ्या छप्पन रेसिपीज् पूर्ण झाल्या आणि कूकपॅडच्या साप्ताहिक थीमसाठी माझ्या रेसिपीला पहिले बक्षीस मिळाले. त्यामुळे ठरवलं तिरंगा थीमसाठी राष्ट्रध्वजाच्या सन्मानार्थ काहीतरी पौष्टिक बनवायचं. आज मी गाजराची कोशिंबीर, फरसबीची भाजी आणि कोबीची भाजी बनवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४५ मिनिटे
३ माणसे
  1. गाजराची कोशिंबीर::
  2. 2गाजरे किसूून
  3. 3 टेबलस्पूनदाण्याचा कुट
  4. 2ते ३ टेबलस्पून चिरलेली कोथिंबीर
  5. चवीनुसारमीठ
  6. 1/2टिस्पून साखर
  7. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  8. फोडणीसाठी
  9. 1 टेबलस्पूनतेल
  10. 1/2 टिस्पून हिंग
  11. 1 टिस्पून जीरं
  12. 4-5कडिपत्याची पाने
  13. 2-3हिरव्या मिरच्या
  14. कोबीची भाजी::
  15. २५० ग्राम लांब चिरलेला कोबी
  16. 1 टेबलस्पूनलिंबाचा रस
  17. 2 टेबलस्पूनओलं खोबरं
  18. गरजेनुसार पाणी
  19. चवीनुसारमीठ
  20. 1/2टिस्पून साखर
  21. 2-3 टेबलस्पूनकोथिंबीर
  22. फोडणीसाठी::
  23. 1 टिस्पून मोहरी
  24. 1/2 टिस्पून हिंग
  25. 4-5कडिपत्याची पानं
  26. 1 टिस्पून उडदाची डाळ
  27. 2-3हिरव्या मिरच्या
  28. 2 टेबलस्पूनतेल
  29. 2सुक्या लाल मिरच्या
  30. फरसबीची भाजी::
  31. २५० ग्राम फरसबी बारीक चिरलेली
  32. 2 टेबलस्पूनलिंबाचा रस
  33. 4-5पाकळ्या चिरलेला लसूण
  34. 2 टेबलस्पूनओलं खोबरं
  35. 1/2 टिस्पून साखर
  36. चवीनुसारमीठ
  37. 2-3 टेबलस्पूनओलं खोबरं
  38. फोडणीसाठी::
  39. 4-5पाकळ्या चिरलेला लसूण
  40. 1/2 टिस्पून हिंग
  41. 1 टिस्पून मोहरी
  42. 4-5कडिपत्याची पानं
  43. 2-3हिरव्या मिरच्या

कुकिंग सूचना

४५ मिनिटे
  1. 1

    गाजराची कोशिंबीर::गाजर किसून घ्या. त्यात साखर, मीठ, कोथिंबीर आणि लिंबू रस घालून मिक्स करा.

  2. 2

    तडका पॅनमध्ये तेल गरम करा. तेलामध्ये जीरं, हिंग, कडिपत्त्ता आणि मिरच्या टाका. फोडणी तडतडली कि कोशिंबीरी मध्ये वरून टाका आणि एक मिनिट झाकून ठेवा.

  3. 3

    फोडणीचा वास कोशिंबीरमध्ये चांगला मुरु द्या. मग एक मिनिटानंतर कोशिंबीर मध्ये दाण्याचा कुट टाकून एकत्र करा.

  4. 4

    कोबीची भाजी::कोबी लांब पातळ चिरून घ्या. गॅसवर पाणी उकळायला ठेवा. पाण्यात लिंबू पिळून घ्या. पाण्यात लिंबू पिळून घ्या. लिंबामुळे कोबीचा रंग बदलत नाही. पाणी उकळलं कि चिरलेला कोबी टाकून गॅस बंद करा आणि लगेच कोबी चाळणीवर ओता. सर्व पाणी निथळू द्या. आता गॅसवर पॅनमध्ये तेल गरम करा. गरम तेलामध्ये मोहरी, हिंग, मिरच्या कडिपत्याची पाने टाका. उडदाची डाळ टाकून परतून घ्या. कोबी टाकून चांगले परता.

  5. 5

    मीठ, साखर घालून वरती फक्त २ मिनिटे झाकण ठेवा. कोबी शिजायला वेळ लागत नाही. २ मिनिटांनी कोबी शिजला कि खोबरं आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा. उडदाची डाळ टाकून परतून घ्या. कोबी टाकून चांगले परता. मीठ, साखर घालून वरती फक्त २ मिनिटे झाकण ठेवा. कोबी शिजायला वेळ लागत नाही. २ मिनिटांनी कोबी शिजला कि खोबरं आणि कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

  6. 6

    फरसबीची भाजी:::फरसबी बारीक चिरून घ्या. पॅनमध्ये तेल गरम करा.जीरं, हिंग, कडिपत्त्ता, हिरव्या मिरच्या आणि लसूण फोडणीत टाकून परतून घ्या. मग चिरलेली फरसबी टाका. लिंबू रस टाका. ५ मिनिटे झाकण ठेवून मंद गॅसवर भाजी शिजू द्या. ५ मिनिटांनी झाकण काढून मीठ, साखर आणि खोबरं टाकून परतून घ्या. परत झाकण ठेवून १-२ मिनिटे शिजवून घ्या. २ मिनिटांनी भाजीमध्ये कोथिंबीर घालून गॅस बंद करा.

  7. 7

    झाल्या आपल्या तिरंगी पौष्टिक भाज्या तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

टिप्पण्या

Similar Recipes