व्हॅनिला कुकीज (vanilla cookies recipe in marathi)

Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386

#noovenbaking
#recipe4
#cooksnap
#NehaShah
माझ्यासाठी कुकिंग मध्ये जी सर्वात अशक्यप्राय वाटणारी गोष्ट होती ,ती अतिशय सहज सुलभ पद्धतीने नेहा मॅडम ने त्यांच्या छान अशा शैलीमध्ये शिकवल्याने माझा बेकिंग मधला आत्मविश्वास द्विगुणित झालेला आहे .आज या कुकिज बनवताना माझा आत्मविश्वास पराकोटीला पोचलेला होता. ह्या कुकीजची चव मला नागपूरहून थेट पुण्यातल्या कॅम्पमधील कयानी बेकरी मध्ये घेऊन गेली, तेथील श्रुजबरी बिस्किट ची मी खुप फॅन आहे आणि बिलकुल तशीच मिळतीजुळती चव आजच्या माझ्या व्हॅनिला कुकीज ला आल्यामुळे मी मनापासुन नेहा मॅम चे आभार मानते .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

4 सर्व्हिंग्ज
  1. 3/4 कपमैदा
  2. 50 ग्रॅमबटर
  3. 50 ग्रॅमपिठीसाखर
  4. 1/2 टेबल स्पूनदूध
  5. 1/4 टी स्पूनव्हॅनिला इसेन्स
  6. 1 पिंचलाल रंग
  7. 1/4 टी स्पूनबेकिंग पावडर

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम एका पसरट भांड्यामध्ये बटर व पिठीसाखर फेटून घ्यावी. त्यामध्ये व्हॅनिला एसेंस, बेकिंग पावडर घालून थोडा थोडा मैदा ऍड करत जावा व मिश्रण एकत्र करत रहावे.

  2. 2

    भांड्यातले हे मिश्रण फोटो मध्ये दाखवल्या नुसार दिसेल. हे मिश्रण पराती मध्ये घेऊन त्याचे 02:01 प्रमाणात भाग करून मोठ्या भागात थोडे थोडे दूध घालून मळून बाजूला ठेवावे. दुसर्‍या भागामध्ये रंग घालून पहिले सारखेच दुधाने भिजवून घ्यावे.आता रंग दिलेला गोळा क्लिन रॅप मध्ये घेऊन अर्धा सेंटीमीटर जाडीचे लाटून आवडते आकार कापून घ्यावे.

  3. 3

    त्यानंतर ह्या कापांना ब्रश ने पाणी लावून एकावर एक ठेवून क्लीन रॅप मध्ये घट्ट गुंडाळून पंचवीस ते तीस मिनिटासाठी फ्रिझर मध्ये ठेवावे.त्यानंतर बाहेर काढावे.

  4. 4

    यानंतर रंग न वापरलेल्या गोळ्याने रंगीत काप कव्हर करून पुन्हा त्याला क्लीन रेप मध्ये घट्ट गुंडाळून रोल करून घ्यावे व पुन्हा पंचेवीस ते तीस मिनिटासाठी फ्रीजरमध्ये ठेवावे.त्यानंतर बाहेर काढावे.

  5. 5

    फ्रीजर मधून काढलेल्या रोल चे काप करावे व पूर्वी गरम केलेल्या मीठ घातलेल्या कढईमध्ये एक ईंचाचे स्टॅण्ड वर एका ताटलीवर हे काप ठेवून वर झाकण ठेवावे. मंद गॅसवर सात ते आठ मिनिटे होऊ द्यावे.कुकीजच्या कडा हलक्या सोनेरी झाल्या की गॅस बंद करावा.गार झाल्यावर सर्व्ह करावे.. परफेक्ट बेकरी स्टाईल व्हॅनिला कुकीज घरी तयार..

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bhaik Anjali
Bhaik Anjali @cook_19425386
रोजी

Similar Recipes