कोकोनट तिरंगा रोल (coconut tiranga roll recipe in marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

कोकोनट तिरंगा रोल (coconut tiranga roll recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15/20 मिनिटे
4/5 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपडेसिकेटेड कोकोनट
  2. 1/2 कपमिल्क पावडर
  3. 1/2 कपदूध
  4. 4-5 टेबलस्पूनसाखर (आवडीनुसार कमी-जास्त करू शकता)
  5. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  6. केशरी व हिरवा रंग

कुकिंग सूचना

15/20 मिनिटे
  1. 1

    एका बाऊल मध्ये मिल्क पावडर व दूध एकत्र करुन हलवून घ्यावे. गुठळ्या राहणार नाही हे पाहावे.

  2. 2

    गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात तूप घालावे. डेसिकेटेड कोकोनट घालून 1/2 मिनिटे परतवून घ्यावे. गॅस मंद आचेवर ठेवून दूधाचे मिश्रण, साखर घालून मिक्स करावे.

  3. 3

    मिश्रण सतत हलवत राहावे. थोडेसे घट्ट होत आले की वेलची पावडर घालून मिक्स करावे. मिश्रण घट्ट झाले की गॅस बंद करावा.

  4. 4

    एका डीश मध्ये तूप लावून त्यात मिश्रण काढून थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर त्याचे तीन समान भाग करून घ्यावेत.

  5. 5

    एक पांढरा, एका मिश्रणात हिरवा रंग घालून गोळा करून घ्यावा. तिसरे मिश्रणात केशरी रंग घालून गोळा करून घ्यावा.

  6. 6

    बटर पेपरवर सुके खोबरे किस टाकून घ्यावा.त्यावर एकेक गोळा घेऊन त्याचा बटरपेपरच्या सहाय्याने लंबगोल आकार व्यवस्थित करून घेणे.

  7. 7

    5/10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे. नंतर त्याचे सुरीने रोल कापून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes