पुरणपोळी

#रेसिपीबुक
#पुरणपोळी #week11
महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो.
पुरणपोळी
#रेसिपीबुक
#पुरणपोळी #week11
महाराष्ट्रात मोठ्या सणाला नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पाडवा, गौरी गणपती, नवरात्र आशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला जातो.
कुकिंग सूचना
- 1
हरभरा डाळ धुऊन शिजवून घ्या. शिजवलेल्या डाळीचे पाणी काढून डाळ पुरणयंत्रातून बारीक वाटून घ्यावी. वाटलेल्या डाळीत गुळ, साखर घालून चांगले परतून घ्यावे. पुरणात उलथणे उभे राहिले तर पुरण तयार झाले समजावे.आता त्यात वेलची पावडर, जायफळ पूड व 2 चमचे तूप घालून चांगले परतून घ्यावे.
- 2
गव्हाच्या पिठात, हळद, पंमैदा व मीठ घालून पाणी घालून नेहमी पेक्षा थोडी सैल कणिक मळून तेल घालून 15-20 मि. ठेवावी. पुरण थंड झाल्यावर कणकेच्या दुप्पट पुरणाचे गोळे करावे.
- 3
कणकेची वाटी करून त्यात पुरणाचा गोळा भरून कणिकेची वाटी बंद करून पुरणपोळी हलक्या हाताने लाटून तव्यावर भाजून घ्या.
- 4
पोळी तूप घालून दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या.
- 5
गरमा गरम पुरणपोळीवर साजुक तूप घालून नैवेद्य दाखवून सर्व्ह करावे.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मध्ये २१ वी रेसिपीआहे, महाराष्ट्रात आणि विदर्भातील नैवेद्याला आवर्जून केला जाणारा गोड पदार्थ म्हणजे पुरणपोळी. पोळा, गौरी, गणपती, होळी अशा अनेक सणाला पुरणपोळीचा नैवेद्य बनविले जाते आज मि स्पेशल गौरी चा पुरण पोळी चा नैवेद्य म्हणून बनविले आहे चला तर बघुया पुरण पोळी Jyotshna Vishal Khadatkar -
पुरणपोळी(puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक#वीक3#पोस्ट1महाराष्ट्रात मोठ्या सणावाराला आवर्जून केला जाणारा पुरणपोळीचा नैवेद्य Arya Paradkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 रेसिपी-1 पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे महानैवेदय. प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. गौरी पूजनाला पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. आमच्याकडे सर्वांना आवडते. Sujata Gengaje -
पुरणपोळी
#पश्चिम #महाराष्ट्रपुरणपोळी म्हणजे महाराष्ट्र लोकांचे पंच पक्वान्न असल्या सारखे जेवण. बहुतेक प्रत्येक सणाला पुरणपोळी हवीच. मग होळी असो नाहीतर पाडवा असो, नाहीतर गौरी गणपती असो. सगळ्यात स्पेशल मेनू दिपाली महामुनी -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीपुरणपोळी ही सर्वत्र महाराष्ट्रात खूपच प्रसिद्ध आहे. कुठलाही सण असो, त्या सणाला पुरण पोळीचा नैवेद्य हा, महानैवेद्य समजला जातो. कुठले पाहुणे जरी आले, तरीही पुरणपोळीचा पाहुणचार केला जातो. आपल्या घरी गणपती बाप्पा पाहुणे म्हणून आले आहे. त्यांचा पाहुणचार म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य मी आज करीत आहे. आणि अचानक आमच्याकडे पाहुणे सुद्धा आले. Vrunda Shende -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #Week11माझ्या कुटुंबात पुरणपोळी सगळ्यांना भरपूर आवडते .विशेष म्हणजे गौरी-गणपतीच्या सणात पुरणपोळी ला विशेष महत्व , गौराई दीड दिवसाची पाहुनी माहेरी आलेली असते आणि तिला गोड-धोड म्हणून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. Minu Vaze -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11मैत्रिणींनो , पुरणपोळी म्हटले की सगळ्यात मोठा पाहुणचार समजला जातो विदर्भात ...त्यामुळे खास पाहुणे आले की पुरणपोळीचा पाहुणचार हवाच..आपल्या खास पाहुण्यासाठी, बाप्पासाठी पुरणाचा पाहुणचार हवाच....मग पुरणपोळी असो की पुरणाचे मोदक....त्यामुळे आज मी विदर्भात केल्या जाणाऱ्या पुरणपोळीचा नैवेद्य दाखविणार आहे बाप्पाला ! Varsha Ingole Bele -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 माहेरवाशीण म्हणून गौरी आल्या की त्यांच्यासाठी छान गोडधोड स्वयंपाक केला जातो.प्रत्येकाकडे वेगवेगळ्या पद्धतीचा नैवेद्य दाखवला जातो.बहिणीच्या सासरी खड्यांच्या गौरी बसतात.मग त्यांच्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य करतात.यावर्षीही आम्ही गेलो होतो.मस्त पुरणपोळी आणि साग्रसंगीत स्वयंपाक करून नैवेद्य अर्पण केला. Preeti V. Salvi -
बदाम काजू पुरणपोळी (badam kaju puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळीपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत.मराठी मध्ये काही ठिकाणी चपातीसाठी पोळी हा शब्द आहे. एक अर्थ होतो की भरलेली चपाती. पोळी हा शब्द पल या धातूपासून बनलेला आहे त्याचा अर्थ असा आहे की विस्तार,पांगापांग आणि संरक्षण करणे. अशा प्रकारे पोळीचा अर्थ असा होती की ज्याचा विस्तार केला जावू शकतो असा पदार्थ. लाटण्याच्या प्रक्रियेने पोळीचा विस्तारच केला जातो. पोळी बनवण्याची प्रत्येक प्रांतात वेगवेगळी पद्धत आहे. महाराष्ट्र ,कर्नाटक आणि आंध्रप्रदेशामध्ये वेगवेगळी पद्धत आहे. Jyoti Gawankar -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11।।।।।सण वर्साचा हा गौरी गणपतीइथ येईल आनंदाला भरती.....साडी चोळी नवी नेसुन मिरवायालागौरी गणपतीच्या सणालाबंदु येईल माहेरी न्यायलागौरी गणपतीच्या सणाला....।।।।। Priyanka Sudesh -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या सणाला बनवला जाणारा पदार्थ. होळी, गौरीपूजन, गुढीपाडवा असे अनेक सणाच्या दिवशी हा पोळीचा प्रकार बनवला जातो. बनवलेल्या पुरणावर पोळी चांगली लाटली जाईल कि नाही हे अवलंबून असते. Swayampak by Tanaya -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#post1#गौरी गणपतीसाठी#पुरणपोळीआपल्याकडे बऱ्याच सणांना पुरणपोळी चा नैवेद्य दाखवला जातो.गोड पुरणपोळी सोबत तिखट आणि झणझणीत कटाची आमटी व गोड खीर असे छान लागते.खास करून गौरी-गणपतीसाठी आरती साठी पुरणाचे दिवे करतात. Bharti R Sonawane -
पुरणपोळी साखर गुळाची (sakharechi puranpoli recipe in marathi)
#Happycookingपुरणपोळी हे महाराष्ट्रात बनणारे एक गोड व महत्त्वाचे खाद्यपदार्थ आहे. देवाला पुरणपोळीचा नैवेद्य हा विशेष च्या निमित्ताने दाखवला जातो. होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो. पूर्वी लोक एखादा सण अथवा पाहुणे आले असता पुरणपोळी करत. याशिवाय नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. Vandana Shelar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा महाराष्ट्रात बनणारा एक गोड व महत्त्वाचा खाद्यपदार्थ आहे. महाराष्ट्रात होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात. याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते. धामि॔क पंरपंरेत पुरणपोळीला फार महत्त्व आहे. लहान मुले आणि वयोवृद्ध लोक सुद्धा पुरण पोळी आवडीने खातात .तसेच गणपती बरोबर गौरी आल्या की त्यांनाही पुरणपोळी लागतेच. म्हणून खास गौरींसाठी हा पुरणपोळीचा नैवेद्य. Prachi Phadke Puranik -
पुरण पोळी (puran poli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11गौरी चा नैवेद्य पुरणपोळी बनवली. पुरणपोळी घरात सर्वाना आवडतात Kirti Killedar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 post1संपूर्ण महाराष्ट्रात गौरी-गणपती साठी पुरणपोळीचा नैवेद्य महत्वाचा असतो. पुरणपोळीच्या थाळीत वरण-भात,कटाची आमटी किंवा सार, कुरडई भजे पापड हे पदार्थांची पण रेलचेल असते. तसेच महाराष्ट्रीयन कुटुंबात ज्या गृहिणीला पुरण पोळी येते तिला सगळा स्वयंपाक येतो असे गृहीत धरले जाते. Shilpa Limbkar -
-
-
पुरणपोळी रेसिपी (puran poli recipe in marathi)
#hrपुरणपोळीला महाराष्ट्रत महत्त्वाचा गोड खाद्यपदार्थ मानला जातो. होळीच्या दिवशी देवाला पुरणपोळी नैवेद्य दाखवितात तसेच होळीच्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य महत्त्वाचा मानला जातो.महाराष्ट्रात गुढीपाडवा,मकर संक्रांत,होळी, बैल-पोळा, श्रावणी शुक्रवार इत्यादी सणांच्या दिवशी पुरणपोळी करतात.याशिवाय दिवाळीच्या लक्षमीपूजनाला किंवा नवरात्रीतील नवमीला सुद्धा पुरण पोळीचे महत्त्व आहे. विशेषत: होळीला घरोघरी पुरणपोळी केली जाते. पुरणपोळी ही गुळवणी, तूप आणि दूध तसेच कटाच्या आमटीबरोबर खाल्ली जाते nilam jadhav -
आम्रखंड (amrakhand recipe in marathi)
#रेसिपीबुक#वीक3#पोस्ट2सणावाराला खास आवर्जून केला जाणारा नैवेद्य Arya Paradkar -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11#पुरणपोळीगणपती बाप्पांच्या आगमनानंतर काही घरांमधे गौराई मातेचे आगमन होते. काही ठिकाणी एक उभी गौरी असते, तर काही ठिकाणी दोन उभ्या असलेल्या गौरी असतात. काही ठिकाणी फक्त मुखवट्याच्या गौरी असतात. कोणी गौरी मातेला पंचकक्वान्नाचा नैवेद्य दाखवतात. काही ठिकाणी गौरीला नाॅनव्हेजचा नैवेद्य पण दाखवला जातो. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते. पण गौरी मातेच्या प्रसादामधे प्रामुख्याने पुरणपोळीचा नैवैद्य दाखवतात. आमच्या कडे गणपती बाप्पांच्या बरोबरच गौरी येतात आणि गणपती बाप्पांच्या बरोबर जेऊन माघारी जातात. मी पुरणपोळी बनवली त्याची रेसिपी देत आहे. Ujwala Rangnekar -
पारंपारिक पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Varsha Pandit -
पुरणपोळी महानैवेद्य (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11पुरणपोळी आणि आप्पे रेसिपी 1 Surekha vedpathak -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11विदर्भ असो किंवा महाराष्ट्र गोड पाहुणचारामध्ये पुरणपोळीचा पाहुणचार मोठा समजला जातो. तसेच नैवेद्यामध्येसुद्धा पुरणपोळीच्या नैवेद्याला खूप महत्व आहे. तेव्हा अशी प्रसिद्ध असणारी पुरणपोळी मला सुद्धा खूप आवडते. आणि हो आपली पुरणपोळी परदेशात सुद्धा तेवढीच फेमस आहे बरं का ! चला मग बघुयात कशी करतात ती.😊 Shweta Amle -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 पुरणपोळी हा नैवेद्य अनेक पूजा कार्याला बनवतात Deepali Amin -
होळी रे होळी माझी आवडती पुरणपोळी
#पुरणपोळीमहाराष्ट्रामध्ये होळीचा सण हा फाल्गुन पौर्णिमेदिवशी साजरा केला जातो. या दिवशी रात्री लाकडांची होळी रचून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून होळी पेटवली जाते. या होळीत विघ्नांचा नाश व्हावा अशी प्रार्थना केली जाते. Dhanashree Suki -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपबुक #week11 माझं सासर विधार्भातलं आहे. गौरी घरी आणणे हा एक सोहळा असतो तिथे त्यानिमित्ताने पुरणपोळी चा खास बेत केला जातो असतो म्हणून मी ही रेसिपी आज इथे देत आहे. Swara Chavan -
पुरणपोळी (Puranpoli recipe in marathi)
#GPR गुढीपाडवा आणि पुरणपोळी हे पश्चिम महाराष्ट्राच एक समीकरणच आहे नवीन वर्षाचा आगमन हे गोड-धोड करून करा राव व ही प्रथा महाराष्ट्रात फार जुनी आहे पुरणपोळी म्हणजे साग्रसंगीत स्वयंपाक आलाच. Supriya Devkar -
पुरणपोळी (puran poli recipe in marathi)
#पश्चिम#महाराष्ट्र#पुरणपोळी म्हणजे आमच्या घरात आवडीचा गोड पदार्थ ,माझ्या मुलांचा तर फार .तसे महाराष्ट्रीयन लोकांच्या सर्व देवी देवताच्या नैवेद्यात तिचे अन्यन्य साधारण महत्व.आज संकष्टी मग काही तरी नैवेद्य हवा मग आज बाप्पा साठी पुरणपोळी केली. Hema Wane -
पुरणपोळी (puranpoli recipe in marathi)
#रेसिपीबुक #week11 मी ह्या वर्षी गौरी साठी गावी गेले नाही म्हणून घरीच त्या दिवशी पुरणपोळी चा नैवेद्य देवाला दाखवला.. Mansi Patwari
More Recipes
- हांडी कर्टुले (रानभाजी) +चना डाळ भाजी (kartule ani chana dal bhaji recipe in marathi)
- ऋषीची भाजी (rushichi bhaji recipe in marathi)
- चीज पोटॅटो नगेट्स (cheese potato nuggets recipe in marathi)
- आलू चीला / बटाटा पॅनकेक्स (aaloo cheela / potato pancake recipe in marathi)
- शेव लाडू (shev ladoo recipe in marathi)
टिप्पण्या (2)