मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)

Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995

#कटलेट#सप्टेंबर
#week 2 #post 1

मिक्स व्हेजिटेबल कटलेट (Mix vegetable cutlets recipe in marathi)

#कटलेट#सप्टेंबर
#week 2 #post 1

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
18 घटक
  1. 1 वाटी पोहे
  2. 2मध्यम आकाराचे बटाटे
  3. 2 चमचे गाजर
  4. 2 चमचेसिमला मिरची
  5. 2 चमचेमका
  6. 2 चमचेफ्रोझन मटार
  7. 2 चमचेपत्तागोबी
  8. 1मध्यम आकाराचा कांदा
  9. 2 चमचेबारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 1 चमचाहिरवी मिरची आलं लसूण ची पेस्ट
  11. 1 टीस्पून धने पावडर
  12. 1 टीस्पूनजीरे पावडर
  13. 1 टीस्पून गरम मसाला
  14. 1 टीस्पून आमचूर पावडर
  15. 1/2 टीस्पून हळद
  16. 1-1/2 टीस्पून तिखट
  17. प्रमाणानुसार मीठ
  18. तेल

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    मिक्स व्हेजिटेबल कटलेट बनविण्यासाठी, जाड पोहे स्वच्छ धुऊन, भिजत ठेवावे. बटाटा उकळुन किसुन घ्यावा.शिमला मिरची, पत्ता गोबी, गाजर, कांदा, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. तसेच हिरवी मिरची आले लसून यांची पेस्ट करून घ्यावी.

  2. 2

    एका पातेल्यामध्ये पोहे मॅश करून घ्यावे. त्यामध्ये किसलेला बटाटा घालावा. वरील सर्व भाज्या तसेच आले लसून पेस्ट हळद तिखट, धने, जीरे पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला, मीठ कोथिंबीर घालून मिश्रण मिक्स करून घ्याव.

  3. 3

    हे मिश्रण मिक्स झाल्यानंतर त्याचे गोल गोल कटलेट तयार करून घ्यावे. सर्व कटलेट तयार झाल्यानंतर रव्यावर घोळवून घ्यावे.

  4. 4

    गॅस वर फ्रायपॅन ठेवून त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालावे. तेल गरम झाले की कटलेट त्यामध्ये शालो फ्राय करावे. कटलेट दोन्ही बाजूंनी खमंग बदामी रंगाचे शेकून घ्यावे.

  5. 5

    तयार आहे आपले गरमागरम क्रिस्पी क्रंची मिक्स व्हेजिटेबल कटलेट. कटलेट सर्विग डिशमध्ये काढून डिश सव्ह करावी.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vrunda Shende
Vrunda Shende @Vrundacook_23365995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes