क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट (crispy veg poha cutlets recipe in marathi)

Manisha Satish Dubal
Manisha Satish Dubal @manishadubal
Sanpada ( Navi Mumbai)

#cpm4 "कूकपॅड रेसिपीज मॅगझीन "
कूकपॅड रेसिपीज मॅगझीन साठी " क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट " ही रेसिपी बनविली आहे. ती तुमच्याशी शेअर करत आहे. हे कटलेट नक्कीच सगळ्या लहान-थोर मंडळीना आवडतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लहान मंडळींना काही न आवडणाऱ्या भाज्यांचा वापर या "पोहा कटलेट" मध्येही करू शकतो. तर बघूया ही "क्रिस्पी व्हेज पोहा कटलेट" रेसिपी 🥰

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

35 मिनिटे
4 - 5 लोकांकरिता
  1. 2वाटया पोहे
  2. 2बटाटे
  3. 1गाजर
  4. 1सिमला मिरची
  5. 1/2 वाटीस्वीट कॉर्न
  6. 6-7हिरव्या मिरच्या + ½ इंच आले + 10-12 लसूण पाकळ्या यांची एकत्रित पेस्ट
  7. 1/2 टेबलस्पून लाल तिखट
  8. 1 टेबलस्पूनगरम मसाला पावडर (कोणत्याही ब्रँडचा)
  9. 1/2 टीस्पून आमचूर पावडर
  10. 1/4 टीस्पून हळद
  11. चवीनुसारमीठ
  12. आवश्यकतेनुसार तेल

कुकिंग सूचना

35 मिनिटे
  1. 1

    प्रथम पोहे नीट करून मिक्सरला बारीक करून घ्यावेत. स्वीट कॉर्नचीपण भरड करावी. गाजर धुऊन खिसून घ्यावे, बटाटे खिसून पाण्यातून 2-3 वेळा धुऊन घ्यावा, जेणेकरून स्टार्च कमी होतील. सिमला मिरची बारीक चिरून घ्यावी. वर सांगितल्याप्रमाणे मिरची पेस्ट व इतर साहित्य घ्यावे.

  2. 2

    पोह्यांची भरड,भाज्या व इत्तर साहित्य, चवीनुसार मीठ एकत्र करावे. स्वीट कॉर्नच्या जाडसर पेस्टमुळे व इत्तर भाज्यांच्या ओलसरपणामुळे पाणी न घालता मळावे. गरज वाटली तरच पाण्याचा वापर करावा. छान गोळा मळून घ्यावा. त्याचे योग्य आकाराचे गोळे करावेत.

  3. 3

    आवडीनुसार गोळ्यांना गोल चपटा किंवा हार्ट शेप देऊन घ्यावेत. गॅसवर तवा योग्य तापमानावर गरम करून तेल घालावे. तेल तापल्यावर कटलेट त्यावर घालून छान क्रिस्पी भाजून घ्यावेत.

  4. 4

    तयार गरमागरम कटलेट सॉस किंवा पुदिना चटणीबरोबर सर्व्ह करावे. कमी तेलात होणारी अतिशय उत्तम रेसिपी आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Manisha Satish Dubal
रोजी
Sanpada ( Navi Mumbai)

Similar Recipes