उपवासाचे बटाटा काप (upwasache kaap recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#Cookpad_Marathi
#GA4 #week1
उपवासाचे बटाटा, वरई तांदूळ, शिंगाडा पिठ, मखान्याचे कुरकुरीत, healthy, स्वादिष्ट काप
बटाटा हे संपूर्ण जगात मोठ्या प्रमाणावर खाल्ले जाणारे जमिनीखाली येणारे एक पीक आहे. बटाटा हे त्याच्या रोपाचे खोड आहे.

बटाट्याचा एक चांगला गुण म्हणजे ते प्रत्येक भाजीसोबत एडजस्ट होते. खाण्यासाठी बटाटे चांगले लागतेच परंतु याव्यतीरिक्त यामध्ये अनेक औषधी आणि सौंदर्य गुण सुध्दा आहेत. बटाटे पौष्टिकतत्त्वांनी भरलेले असेत. बटाट्यामुळे जास्त प्रमाणात स्टॉर्च असते. बटाटे क्षारीय असते, जे खाल्ल्याने शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित राहते. बटाट्यामध्ये सोडा, पोटाश आणि व्हिटॅमिन ए आणि डी परिपुर्ण प्रमाणात असते. बटाटा नेहमी सालासोबत शिजवला पाहीजे. बटाट्याचे सर्वात पौष्टिक भाग त्याच्या सालाच्या खाली असते, जे प्रोटीन आणि खनिजने भरपूर असते. बटाटा उकडून किंवा भाजुन खाता येते. यामुळेच याचे पौष्टीकतत्त्व सहज पचतात.

उपवासाच्या दिवशी साबुदाणा खिचडी खाऊन कंटाळा येतो. आणि साबुदाणा पचायला जाड असतो.
चला तर मग आज बनवूयात साधी सोपी आणि लवकर होणारे उपवासाचे बटाटा, वरई तांदूळ, शिंगाडा पिठ, मखान्याचे कुरकुरीत, healthy, स्वादिष्ट काप.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
3 मेम्बर्स
  1. साहित्य :
  2. 3 ते ४ बटाटे स्लाइसमध्ये कापलेले
  3. 3 टेबलस्पून्स वरई तांदूळ मिक्सर मध्ये बारीक केलेले
  4. 3 टेबलस्पून्समखाना
  5. 3 टेबलस्पूनशिंगाडा पीठ
  6. १/2 टेबलस्पून शेंगदाणे
  7. 3 ते ४ बटाटे स्लाइसमध्ये कापलेले
  8. 3हिरव्या मिरच्या
  9. 1 टेबलस्पूनकोथिंबीर
  10. 1 टीस्पूनजिरे
  11. 10 मिरे
  12. आवश्यकतानुसार तेल
  13. आवश्यकतानुसार शेंदे मीठ

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सगळ्यात पहिले मखाना १ टीस्पून तेल कढईत टाकून भाजून घ्या थंड झाल्यावर मिक्सर मध्ये बारीक करा.नंतर वरई तांदूळ आणि मिरे मिक्सर मध्ये बारीक करून घ्या. शेंगदाने हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ मिक्सर मध्ये बारीक करा.

  2. 2

    यानंतर वरील सर्व घटक एका भांड्यात एकत्र करा. त्यात आवश्यकतानुसार पाणी टाकून भज्याच्या पीठा सारखे मिश्रण भिजवा आणि १० मिनिटें मिश्रण रेस्ट करण्यासाठी ठेवून द्या.आता बटाट्याचे गोल आकारात स्लाइस करा.

  3. 3

    १० मिनिटानंतर तवा गरम करा. त्यात १ टीस्पून तेल टाका. एक बटाट्याचे स्लाइस घ्या. मिश्रणात बुडवून घ्या. मिश्रण दोन्ही बाजूला लागले पाहिजे. मिश्रणात बुडविलेले बटाट्याचे स्लाइस गरम तव्यावर टाकून दोन्ही बाजूने फ्राय करा. तव्यावर झाकण ठेवा.

  4. 4

    असेच सारे बटाट्याचे स्लाइस फ्राय करा आणि गरमागरम उपवासाचे बटाटा, वरई तांदूळ, शिंगाडा पिठ, मखान्याचे कुरकुरीत,स्वादिष्ट काप दह्यासोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes