अळूवडी(aluwadi recipe in marathi)

Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
मुंबई

#रेसिपीबुक
#week2
#गावाकडच्या आठवणी
आमच्याकडे गावाला पावसाळ्यात अळूची पाने भरपूर येतात. गणेश चतुर्थीला नैवेद्यात अळूचा एखादा पदार्थ हवाच मग त्या अळूवड्या असोत की अळूची भाजी किंवा अळूच्या गाठया असोत. अळूच्या गाठया या भाजीच्या अळूपासून बनवतात अळूची पानं लांब तोडून त्याची गाठ बांधायची या गाठ्याची भाजी अप्रतिम लागते. या गाठया बनविण्यासाठी आम्ही सर्वजण मदत करायचो. पण त्यात जास्त आम्हाला अळूवड्या आवडायच्या. अजूनही अळूवडी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. तर या अळूवड्या कश्या बनवतात त्याची रेसिपी आपण बघू या....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
८-१० जण
  1. २५० ग्राम बेसन
  2. 1 टेबल स्पूनतांदळाचे पीठ
  3. 1 टिस्पून आलं लसूण पेस्ट
  4. 3 टिस्पून मालवणी मसाला
  5. 2 टिस्पून धनेजिरे पावडर
  6. चवीनुसारमीठ
  7. 2 टेबल स्पूनचिंच
  8. 2 टेबल स्पूनकोकम आगळ/कोकम
  9. 4मोठी अळूची पाने

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम चिंच धुवून घ्या त्यात कोकम आगळ व थोडं पाणी घालून अर्धा तास ठेवा. अळूचे देठ काढून टाका, अळूच्या पानाच्या फुगीर शिरा वरचेवर सुरीने कापा नंतर त्यावर लाटणी फिरवा. बाऊलमध्ये बेसन, तांदूळ पीठ, मालवणी मसाला, धनेजिरे पावडर, मीठ, आलं लसूण पेस्ट, व थोडं चिंचेचा बनवलेला कोळ घालून सर्व्ह एकजीव करा.

  2. 2

    बेसनाच्या मिश्रणात चिंचेचा कोळ थोडा घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून मध्यम बॅटर बनवा. अळूचे पान घेऊन त्याला चिंच कोकम आगळ मिश्रित कोळ लावून घ्या.

  3. 3

    कोळ लावलेल्या पानावर बेसनचे मिश्रण लावून घ्या त्यावर विरुद्ध दिशेने दुसरं पान ठेवा. त्याही पानाला कोळ लावून मग बेसनचे मिश्रण लावून घ्या.

  4. 4

    आता पानाचा खालचा भाग थोडा दुमडा नंतर दोन्ही बाजूचा भाग दुमडा त्यावर बेसनचे मिश्रण लावा व पान घट्ट गुंडाळा. अश्याच प्रकारे दुसरी दोन पाने गुंडाळून घ्या. चाळणीला तेल लावून हे दोन्ही रोल त्यात ठेवा. गॅसवर टोपात पाणी गरम करून त्यावर ही चाळणी झाकण लावून ठेवा. १५ मिनिटे मोठ्या आचेवर वाफवून घ्या.

  5. 5

    १५ मिनिटानंतर गॅस बंद करून झाकण काढून चाळणी बाहेर काढा, अळूवड्या पूर्णपणे थंड होऊ द्या. नंतर त्याच्या सुरीने वड्या पाडा. तेलात कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या. टिशू पेपरवर काढा.

  6. 6

    मस्त गरमागरम अळूवड्या सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_20313774
रोजी
मुंबई

Similar Recipes