आम्रखंड डोनट (amrakhand donut recipe in marathi)

Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
Mumbai

#rbr

रक्षाबंधन म्हणजे आपल्या घरातील चिमुरड्यांची धम्माल.... गोड धोड नी नुसती मज्जा मस्ती .. तर माझ्या घरातील छोट्या बहीण भावांसाठी मी बनवले हे donut...

या डोरेमोन मुळे हे donut चे वेड माझ्या मुलाल लागलं.... तो डोरेमॉन कसा donut खातो ते मला बनवून दे... आणि कूक पॅड ची रक्षाबंधन थीम सुद्धा आली .... तर वाटल चला एका दगडात दोन पक्षी मारुया.... थीम पूर्ण केल्याचा मला आनंद आणि donut घरच्या घरी तयार म्हणून मुलगा खूष....

डोनट हे आपण नेहमीच चॉकलेट मध्ये डीप करून खातो... पण मनात विचार आला जर का आम्रखंड मध्ये डीप केले तर... आणि खरच ते इतके टेस्टी लागले अगदी श्रीखंड पुरीच खात आहोत असाच भास झाला....

तर या रक्षाबंधनाला हे donut नक्की ट्राय करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
चार जणांसाठी
  1. १०० ग्रॅम गव्हाच पीठ
  2. 6 टेबलस्पूनआम्रखंड
  3. 6 टेबलस्पूनपिठी साखर
  4. 1/2 टीस्पूनबेकिंग सोडा
  5. 1/2 टीस्पूनबेकिंग पावडर
  6. 4 टेबलस्पूनबटर किंवा कुकींग ऑईल
  7. 4 टेबलस्पूनदही
  8. 1 टीस्पूनव्हॅनिला इसेन्स
  9. 1/4 टीस्पूनमीठ
  10. तेल तळण्यासाठी
  11. ड्राय फ्रूट पावडर
  12. पिठी साखर सजावटीसाठी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम एका वाटी मध्ये गव्हाचे पीठ घेऊन त्यात पिठीसाखर, व्हॅनिला इसेन्स, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, बटर किंवा तेल आणि मीठ घालून चांगले एकजीव करावे.

  2. 2

    वरील एकजीव झालेले मिश्रण मळताना त्यामध्ये थोडे थोडे दही घालावे. त्यात अजिबात पाणी न घालता दही नेच ते मळून घ्यावे. हा मळलेला गोळा अर्धा तास झाकून ठेवावा

  3. 3

    आता अर्ध्या तासानंतर वरील गोळ्याची एक पोळी लाटून घ्यावी. लाटलेल्या पोळीवर एका गोल वाटीच्या साहाय्याने आकार देऊन घ्यावा... त्या गोल आकारामध्ये अजुन एक लहान आकार देऊन त्याची पोकळी करावी....

  4. 4

    वरील पोळीमधले बाकीचे जादा पीठ काढून टाकावे. आता आपल्याला डोनट चा आकार मिळेल. अशाप्रकारे सर्व डोनट बनवून घ्यावेत.

  5. 5

    एका कढईत तेल किंवा तूप टाकून त्यात हे तयार केलेले डोनट दोन्ही बाजूने मंद आचेवर तळून घ्यावेत.

  6. 6

    या तळलेल्या डोनट वर गोलाकार आम्रखंड लावून घ्यावे... किंवा ते आम्रखंड मध्ये डीप करावे... त्यावर ड्राय फ्रूट ची पावडर घालावी...

  7. 7

    अशाप्रकारे आपले आम्रखंड डोनट तयार करून एका प्लेटवर पिठी साखर घालून बच्चे कंपनीला सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Aparna Nilesh
Aparna Nilesh @cook_Aparna9224
रोजी
Mumbai
cooking makes my tummy happy🍱
पुढे वाचा

Similar Recipes