मेथी दाण्याची चटपटी चटणी (methi danyachi chutney recipe in marathi)

Monali Modak
Monali Modak @cook_23792152

#GA4 #WEEK2
मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अॅनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणाऱ्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतसमान आहेत. आज मी मेथी दाणे पासून चटणी बनवलेली आहे. आणि त्याची रेसिपी तुमच्या सोबत शेअर करीत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 ते 7 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 1कटोरी मोड आलेले मेथीदाणे
  2. 1कटोरी बारीक चिरलेला कांदा
  3. 1कटोरी बारीक चिरलेला टोमॅटो
  4. 1 चमचाजिरे
  5. 1 चमचाकडीपत्ता
  6. 1 चमचामिरची बारीक चिरलेली
  7. चवीनुसार मीठ
  8. 1 ते 1/2 चमचा फोडणीसाठी तेल
  9. 1 चमचाबारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या

कुकिंग सूचना

5 ते 7 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम एका कढईमध्ये तेल तापवून घ्या तेल गरम झाल्यावर त्यामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या झाला आणि थोडे जिरे घालून परतून घ्या

  2. 2

    आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेली मिरची कोथिंबीर घालून परतून घ्या

  3. 3

    टोमॅटो आणि कांदा चांगल्या प्रकारे परतून झाल्यावर त्यामधील मोड आलेली मेथी दाने घालून घ्या आणि तीन ते चार मिनिट शिजू द्या

  4. 4

    आता त्यामध्ये तुमच्या चवीनुसार मीठ घालून घ्या आणि कोथिंबीर टाकून घ्या

  5. 5

    मेथी दाण्याची ही चटपटी चटणी तुम्ही चपाती सोबत सर्व करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Monali Modak
Monali Modak @cook_23792152
रोजी

टिप्पण्या (2)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
तिखट हळद काही घालायचे नाही का

Similar Recipes