चटणी चीझ सँडविच (chutney cheese sandwich recipe in marathi)

Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP

#GA4 #week3
सँडविच म्हंटलं कि नानाविध प्रकारची सँडविच डोळ्यासमोर उभी राहतात आणि ती डोळ्यासमोर उभी राहात असतानाच त्याची चवही जिभेवर रेंगाळायला सुरु होते. असच आज मला आठवण आली चटणी चीझ सँडविचची. हे सँडविच माझ्या ऑफिसमधे मिळायचं. आज घरी करुन परत ती चव अनुभवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनीटं
२ सर्व्हिंग
  1. 4ब्रेड स्लाईस
  2. 2चीझ क्युब्स
  3. 2 टेबलस्पूनअमूल बटर
  4. चटणीसाठी
  5. 1 कपकोथिंबिर
  6. 1/2 कपखोवलेलं ओलं खोबरं
  7. 2हिरव्या मिरच्या
  8. 1/4 कपपुदिन्याची पानं
  9. 3-4लसूण पाकळ्या
  10. 1 टीस्पूनसाखर
  11. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

१५ मिनीटं
  1. 1

    प्रथम कोथिंबिर, खोबरं, पुदिना, लसूण, हिरव्या मिरच्या, साखर आणि मीठ घालून मिक्सरमधे चटणी वाटून घ्यावी.

  2. 2

    आता २ ब्रेड स्लाईस घेऊन एका स्लाईसला बटर आणि दुसर्‍या स्लाईसला तयार चटणी लावावी. आता बटर लावलेल्या ब्रेडवर चीझ किसून घालावे.

  3. 3

    टोस्टरमधे खाली चीझ लावलेला आणि वरती चटणी लावलेला ब्रेड ठेऊन टोस्टर बंद करावा आणि गॅसवर सँडविच दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यावे. चटणी चीझ सँडविच खायला तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Prachi Phadke Puranik
Prachi Phadke Puranik @cook_24245173_PP
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes