मिक्स कडधान्याची ग्रव्ही (mix sprouts gravy recipe in marathi)

Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
Virar West

#GA4 #week4

की- वर्ड Gravy वापरून मी आज ही मिक्स कडधान्याची ग्रेव्ही शेअर करत आहे.
कडधान्य हे पौष्टिक आणि या मध्ये खूप प्रोटीन असतातच तसेच हे एक उत्तम हेल्दी व्हेज डिश आहे.

मिक्स कडधान्याची ग्रव्ही (mix sprouts gravy recipe in marathi)

#GA4 #week4

की- वर्ड Gravy वापरून मी आज ही मिक्स कडधान्याची ग्रेव्ही शेअर करत आहे.
कडधान्य हे पौष्टिक आणि या मध्ये खूप प्रोटीन असतातच तसेच हे एक उत्तम हेल्दी व्हेज डिश आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

७ तास,१/२ तास
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 वाटीमिक्स कडधान्य
  2. 2बटाटे
  3. 1कांदा
  4. 1टोमॅटो
  5. 3 टेबलस्पूनखोबऱ्याचा मसाला (घरी केलेला)
  6. 2 टीस्पूनलाल तिखट
  7. 1 टीस्पूनहळद
  8. 1 टीस्पूनगरम मसाला
  9. 1 टीस्पूनधना पावडर
  10. चवीनुसार मीठ
  11. 2 टीस्पूनतेल
  12. आवश्यतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

७ तास,१/२ तास
  1. 1

    प्रथम १ वाटी कडधान्य घ्या, मी आज मूग,मटकी, चणे,सफेद वाटणे आणि काळे वाटाणे घेतले आहेत.हे सर्व सम प्रमाणात घेऊन एकत्र स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या,त्या मध्ये गरजे नुसार पाणी घालून रात्र भर भिजत घालावे. मी सकाळी बनवणार आहे म्हणून रात्र भर तुम्हाला जर रात्री बनवायचे असेल तर सकाळी भिजत घालावे.७ तास तरी भिजले पाहिजे

  2. 2

    मी या मध्ये खोबऱ्याचा मसाला वापरला आहे तो म्हणजे मी सुके खोबरे,कांदा,आले,लसूण,हिरवी मिरची, कोथिंबीर या ने बनवला आहे.आमच्या कडे अशा पद्धतीने कडधान्याच्या ग्रेव्ही मध्ये वापरला जातो.याची रेसिपी मी नक्की लवकरच शेअर करेन

  3. 3

    सकाळी कडधान्य मधील पाणी काढून घ्या,नवीन पाणी घालून त्या मध्ये बटाट्याचे मध्यम तुकडे कापून त्या मध्ये घाला,थोडे पाणी घालून कुकर मध्ये ५ शिटी येई पर्यंत शिजवून घ्या. तो पर्यंत कांदा टोमॅटो ला मिक्सर मधून बारीक वाटून घ्या.

  4. 4

    गॅस वर कढई तापत ठेवा,त्या मध्ये तेल घालून घ्या,तेल तापले की कांदा टोमॅटो ची पेस्ट घालून घ्या,पेस्ट रंग बदलू लागली की खोबऱ्याचा मसाला घालून मिक्स करून घ्या,त्या मध्ये लाल तिखट,हळद,गरम मसाला,धना पावडर घालून छान एकजीव करून घ्या,साईड ने तेल सुटे पर्यंत स्लो गॅस वर राहू द्या,तेल सुटू लागले की शिजवलेले कडधान्य आणि बटाटे घालून छान परतून घ्या, चवीनुसार मीठ घालून घ्या

  5. 5

    ,गरजे नुसार पाणी घालून छान उकळ येऊ द्या.ग्रेव्ही ठेवायची आहे म्हणून पाणी जरा जास्त घाला ८-१० मिनिटे स्लो गॅस वरच ठेवा.

  6. 6

    कडधान्याची ग्रेव्ही भात आणि भाकरी आणि पोळी सगळ्या सोबत छानच लागते... आवडीनुसार खाऊ शकतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Gamre Joshi
Shilpa Gamre Joshi @Shilpa_1986
रोजी
Virar West
मला कुकिंग बद्दल सांगायचे झाले तर ते मला माझ्या आई कडून प्रेरणा मिळाली,तिच्या सारखे आपल्याला पण जमले पाहिजे अशी ईच्छा होती... आणि आता ती इच्छा माझी ओळख बनली.मला कुकींग करून फ्रेश वाटते.खूप छान अनुभव येतो.आणि त्या वरून घरच्या माझ्या मंडळींची ची दाद ...अविस्मणीय.....
पुढे वाचा

Similar Recipes