शेवग्याच्या शेंगांची आमटी (Shevgyachya shengachi amti recipe in marathi)

आशा मानोजी
आशा मानोजी @asha_manoji

#mlr
शेवग्याच्या शेंगा मध्ये विटामिन , कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असते. तूरडाळ , मसूर डाळ किंवा मूग डाळीची आमटी करताना शेवग्याच्या शेंगा घातल्यानंतर त्याला मस्त चव येते त्याचा आहारात समावेश केल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते हाडे मजबूत होतात तसेच वजन नियंत्रणात राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
4 लोक
  1. 125 ग्रामतूरडाळ
  2. 2शेवग्याच्या शेंगा
  3. 1टोमॅटो
  4. 8 ते10 कढिपत्ता पाने
  5. 2 चमचेतिखट
  6. 1 चमचामोहरी
  7. 1 चमचाजीरे
  8. 1/4चमचाहळद
  9. 2 चमचेतेल फोडणीसाठी
  10. मीठ चवीनुसार
  11. 1/2 चमचाहिंग
  12. 1 चमचाआलं लसूण पेस्ट

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    तूर डाळ कुकर मधून मस्त शिजवून घ्यावी. त्यामध्ये टोमॅटोही शिजवून घ्यावा

  2. 2

    गॅसवर एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये फोडणीचे साहित्य घालावे.

  3. 3

    थोडेसे पाणी घालून शेंगा शिजवून घ्याव्या

  4. 4

    शिजवलेली तुरडाळ त्यामध्ये घालून एक उकळी आणावी

  5. 5

    बारीक चिरलेली कोथिंबीर वरून पेरावी शेवग्याच्या शेंगांची आमटी गरम गरम भाता सोबत खाण्यासाठी तयार आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
आशा मानोजी
रोजी

Similar Recipes