मनगणे / मनगनं (mangan recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#पश्चिम #गोवा
मनगणे / मनगनं/ चण्याच्या डाळीचा पायसम ही एक गोड खीर आहे जी गणेश चतुर्थीच्या दिवशी गोव्यात बनवली जाते बनवायला एकदम सोपी आणि चवीला उत्कृष्ट आहे ही रेसिपी तुम्ही थंड किंवा गरम सर्व्ह करू शकता ही डिश गोड आहे आणि गोवा हिंदू फेस्टिवल मध्ये प्युअर व्हेजिटेरियन थाळी या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपहरभरा डाळ /चणाडाळ
  2. 1 कपघट्ट नारळाचे क्रीम
  3. 2-3 कप नारळाचे दूध
  4. 1/2 वाटीगूळ
  5. 1/2 टीस्पूनवेलची पावडर
  6. 1पिंच/चिमुट मीठ
  7. 3-4काजू
  8. 1 टीस्पूनतूप
  9. 1-2 टेबलस्पूनखोवलेला नारळ/ नारळाचे काप (ऑप्शनल)

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    हरभरा डाळ स्वच्छ करून 3 ते 4 तास भिजत घालावी त्यानंतर 1/2 नारळाचे दूध घालून कुकरमध्ये 5 ते 6 शिट्या करून घ्यावे कुकर गार झाला की डाळ घोटून घ्यावी.

  2. 2

    एका भांड्यामध्ये तूप गरम करून घ्यावे त्यावर काजू घालून घोटलेली डाळ घालावी नारळाचे दूध घालावे आणि मिक्स करावे.

  3. 3

    मिश्रणाला उकळी आली की त्यात गूळ घाला आणि गूळ विरघळला की त्यात वेलची पावडर घालून गॅस बंद करावा सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून वरून खोवलेला नारळ/ नारळाचे काप (ऑप्शनल) घालून मणगणे सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes