तिखट मसाला पनीर (masala paneer recipe in marathi)

Swati Pote
Swati Pote @cook_24317961

#GA4
#Week6
#पनीर...ओळखलेला कीवर्ड
#ढाबास्टाईल( ग्रेव्ही)तिखटमसालापनीर
पनीर काहींना खूप आवडते तर काहींना अजिबात नाही. दूध हा मूळ घटक असल्याने मात्र पनीर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. प्रथिनयुक्त असा हा पदार्थ आहारात असणे अतिशय आवश्यक आहे. शाकाहारी लोकांची पहिली पसंती पनीरच असते. पनीर प्रथिनयुक्त असल्याने ते आरोग्यदायी आहे. पनीर हा चव आणि आरोग्य यांचा अप्रतिम संगम आहे. आपण अनेकदा केवळ हॉटेलमध्ये गेल्यावरच पनीर खाणे पसंत करतो. मात्र पनीरचे काही पदार्थ आपण घरीही करु शकतो. तर चला आज आपण ढाबा स्टाईल (ग्रेव्ही) तिखट मसाला पनीर करूयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
3 मेंबर्स
  1. साहित्य:
  2. २०० ग्रॅम पनीर
  3. 2मोठे बारीक कापलेले कांदे
  4. 2टोमॅटोची पेस्ट
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. १ टेबलस्पून अदरक लसुन पेस्ट
  7. १ टेबलस्पून भाजलेले बेसन
  8. २-३तेजपत्ता
  9. 3लवंग
  10. 3चक्री फुल
  11. 1 टीस्पूनजीरे
  12. 5काळे मिरे
  13. 2 कपपाणी ,
  14. 2 टेबलस्पूनसाजूक तूप
  15. 1 टीस्पूनहळद पाउडर
  16. 1 टीस्पूनधने पाउडर
  17. १ टीस्पून गरम मसाला पाउडर
  18. 1 टीस्पूनकस्तुरी मेथी
  19. 1-2बेडगी मिरचीचे तिखट तुमच्या चवीनुसार
  20. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    सगळ्यात पाहिले पनीर तुमच्या आवडत्या आकारात कापून तळून घेणे.

  2. 2

    नंतर एक मोठी कढई घ्या.त्यात दोन चमचे साजूक तुप टाकून गरम करा आणि ह्यात आता सगळे खडे मसाले,हिरव्या मिरच्याचे मोठे तूकडे कापून १ मिनिट परतून भाजून घ्या.

  3. 3

    त्यानंतर कांदा परतून घ्या.आता परत अदरक, लसुन, कोथिंबीर पेस्ट टाकून परतून घ्या.

  4. 4

    पुढे त्यात हळद, तिखट, धने पावडर, गरम मसाला टाकून मिक्स करून घ्या.आता त्यात टोमॅटो पेस्ट टाकून मिक्स करा आणि १ मिनिट शिजवून घ्या.

  5. 5

    आता बेसन घालून परतून घ्याआणि त्यात मीठ आणि गरम पाणी घालून २ मिनिटे शिजवून घ्या. मसाला (ग्रेव्ही) आता तयार आहे. त्या मसाल्यात पनीरचे पीसेस टाकून थोड्या वेळ शिजवून घ्या.

  6. 6
  7. 7

    ढाबा स्टाईल (ग्रेव्ही) मसाला पनीर. कोथिंबीर टाकून सजवून घ्या. आणि गरमागरम ढाबा स्टाईल (ग्रेव्ही) मसाला पनीर नान,चपाती, पराठ्यासोबत सर्व्ह

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Swati Pote
Swati Pote @cook_24317961
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes