मिक्स वहेज चीज पुलाव (mix veg cheese pulao recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#GA4 #week8 #Sweetcorn #Pulao is
नमस्कार!
व्हेजिटेरिअन डिशमधील सर्वांचाच खूप आवडता मेनू. विविध प्रकारे बनवला जाणारा , चविष्ट असा हा पुलाव जेवणाची लज्जत वाढवतो. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेवून आले आहे, वेगळा प्रकार__मिक्स व्हेज चीज पुलाव.करायला थोडा वेळ लागतो, कारण थर देवून केला आहे, पण स्वाद पहाता तुम्हीही आवर्जुन नक्की करून पहालच.

मिक्स वहेज चीज पुलाव (mix veg cheese pulao recipe in marathi)

#GA4 #week8 #Sweetcorn #Pulao is
नमस्कार!
व्हेजिटेरिअन डिशमधील सर्वांचाच खूप आवडता मेनू. विविध प्रकारे बनवला जाणारा , चविष्ट असा हा पुलाव जेवणाची लज्जत वाढवतो. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेवून आले आहे, वेगळा प्रकार__मिक्स व्हेज चीज पुलाव.करायला थोडा वेळ लागतो, कारण थर देवून केला आहे, पण स्वाद पहाता तुम्हीही आवर्जुन नक्की करून पहालच.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 ते 1:15 तास
5 ते 6 लोकांसाठ
  1. 3 वाट्याबासुमती तांदूळ
  2. 2-3गाजर
  3. 3ढोबळी मिरची
  4. 125 ग्रॅमफरस बी
  5. 125 ग्रॅमकोबी
  6. 125 ग्रॅमफ्लाॅवर
  7. 1स्विटकाॅर्नचे दाणे
  8. 7-8मोठे कांदे
  9. 2-3टोमॅटो
  10. 50 ग्रॅमचीज
  11. 1 वाटी कोथिंबीर
  12. 1 वाटी पुदिना
  13. खडा मसाला
  14. 6-7 6-7 लवंग
  15. 6-7 मिरी
  16. 6-7चक्रिफूल मसाला
  17. 6-7वेलची
  18. 15-20काजू, 15-20 बेदाणे
  19. 2-3 चमचेशहाजीरे, 4-चमचे तूप, हिंग
  20. 5-6हिरवी मिरची
  21. 2-3 चमचेसोया साॅस
  22. 4 चमचे रेड चिली साॅस,
  23. 6-7 चमचे टोमॅटो साॅस
  24. 6-7 चमचेतेल, मीठ

कुकिंग सूचना

1 ते 1:15 तास
  1. 1

    साहित्य

  2. 2

    प्रथम एका पातेल्यात 2-3 चमचे तेल गरम करून त्यात हिंग,शहाजीरे व सर्व खडा मसाला टाकून थोडे कमी पाणी घालून मोकळा भात करून घ्यावा. पसरून ठेवावा. तो थंड होईपर्यंत भाजीची तयारी करावी.

  3. 3

    सर्व भाज्या पातळ व लांब चिरून घ्याव्यात. कोथिंबीर, पुदिना बारीक चिरून घ्यावा. कांदा व टोमॅटो उभे पातळ चिरून घ्यावे.चिरलेला अर्धा कांदा, कोथिंबीर व पुदिना तळून घ्यावा. काजू व बेदाणेही तळून घ्यावेत.

  4. 4

    एक कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरेची फोडणी करून हिरवी मिरचीचे लांब काप व आले- लसूण पेस्ट घालावी.उरलेल्या कांद्यातला पाऊण भाग यात घाला. कांदा भाजला की टोमॅटोही घाला, हे मऊ झाले की सर्व साॅस टाकावेत, नीट मिसळले की सर्व भाज्या धुवून घालाव्यात. मीठ घालावे. जेवढे पाणी सुटेल तेवढ्यावरच भाजी शिजू द्यावी. अर्धवट शिजवावी. भाजी थंड होऊ द्यावी.

  5. 5

    आता एक पसरट पातेले घेवून थोडे तेल टाकून उक्षलेला कांदा त्यावर पसरवावा. लगेच त्यावर प्रथम भाताचा थर द्यावा.

  6. 6

    त्यावर भाजीचा थर द्यावा.

  7. 7

    त्यावर तळलेला कांदा पसरवावा.

  8. 8

    त्यावर तळलेले काजू, बेदाणे, कोथिंबीर व पुदिना पसरवावा.

  9. 9

    त्यावर चीज किसून जाड थर द्यावा.

  10. 10

    अशाप्रकारे थर देवून शेवटी चीजचा थर द्यावा. झाकण ठेवून गॅस बारीक करून 10-12 मिनिटे ठेवावे. नंतर गॅस बंद करावा. वाढताना थोडा थोडा मिक्स करत वाढावा. याप्रमाणे मोडाच्या धान्याचे थर देवून, पनीरचे बारीक चौकोनी काप करून तळून त्याचे थर देवूनही कल्पकता वापरून हा पुलाव बनवून त्यात विविधता आणता येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namita Patil
Namita Patil @namitapatil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes