पुदिन्याची चटणी (pudina chi chutney recipe in marathi)

Namita Patil
Namita Patil @namitapatil

#cn
#पुदिन्याची चटणी
महाराष्ट्रीयन जेवणाची एक खासियत म्हणजे ताटभर जेवण. व्हेज असो, नाॅनव्हेज असो...पण चटण्या, रायते, कोशिंबीर, तळण या सगळ्याचा समावेश असतो. यामुळे जेवणाची लज्जत तर वाढतेच...परंतु सकस, चौरस आहारामुळे आरोग्यही उत्तम राहते. म्हणूनच ताटामध्ये ओल्या, सुक्या चटण्यांचा सर्रास वापर केला जातो. आज मीही तुमच्यासाठी चटणीचा एक वेगळा प्रकार घेवून आले आहे. हि चटणी पावभाजीचे पाव भाजताना पावाला लावते. लोणी किंवा बटर आणि ही चटणी यामुळे पावाला खूपच छान टेस्ट येते.
बघूया रेसिपी....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५-२० मि.
३-४ लोकांसाठी
  1. 1 वाटीपुदिना
  2. 1/2 वाटीकोथिंबीर
  3. 4-5लसूण पाकळ्या
  4. 1 लहानतुकडा आले
  5. 2हिरव्या मिरच्या
  6. मीठ
  7. 1 चमचासाखर
  8. 1 लहानचहचा जीरे

कुकिंग सूचना

१५-२० मि.
  1. 1

    प्रथम पुदिना, कोथिंबीर स्वच्छ धुवून निथळत ठेवावे. आले धुवून बारीक तुकडे करून घ्यावे. मिरचीचे तुकडे करावेत.

  2. 2

    बारीक केलेले सर्व साहित्य व इतर सर्व साहित्य मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. खूप घट्ट करू नये.

  3. 3

    ताटाला लावण्यासाठी करायची असेल तर घट्ट करावी आणि यात लिंबू पिळावे. पावाला लावून भाजताना पॅनवर बटर किंवा लोणी टाकून त्यावर चटणी घालावी व पाव घालावेत व खरपूस भाजून घ्यावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Namita Patil
Namita Patil @namitapatil
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes