चकली (chakli recipe in marathi)

Pallavi Musale
Pallavi Musale @Pallavi74

#diwali21
दिवाळीतील सर्वांचा आवडता पदार्थ चकली,

चकली (chakli recipe in marathi)

#diwali21
दिवाळीतील सर्वांचा आवडता पदार्थ चकली,

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 ते7व्यक्ती
  1. 3 वाट्याघरी केलेली चकली भाजणी
  2. 1/2तीळ
  3. 1/4 टीस्पूनओवा
  4. 8 टीस्पून तेल मोहन घालण्यासाठी
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. चिमूटभरहिंग
  8. तळनिसाठी तेल
  9. चवीनुसारमीठ
  10. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    1 की तांदूळ,अर्धा किलो चणाडाळ,पाव किलो उडदाची डाळ,उडदाच्या निम्मी मुगाची डाळ 1 वाटी जाड पोहे,अर्धी वाटी धने पाव वाटी जीरे, तांदूळ धुवून वाळवून घ्यावे,सर्व साहित्य भाजून घ्यावे,खूप भाजू नये,मग भाजणी घरघंटीतून दळून आणावी एकदम बारीक दलु नये

  2. 2

    चकल्यांकरिता 3 वाटी भाजणी घेतली तर 8 चमचे तेल घेणे,3 वाट्या भाजणी भाजणी घेतली तर पावणे तीन वाट्या पाणी घ्यावे,एका पातेलीत पाणी घेऊन उकळत ठेवावी

  3. 3

    पाण्यात घालायच्या साहित्याची तयारी करून घ्यावी

  4. 4

    पाण्याला उकळी आली की त्यात मीठ,हिंग,ओवा,तेल हळद तिखट घालावे,चांगले उलथ्याने हलवून लगेच चकलीची भाजणी घालावी व हलवून घ्यावे

  5. 5

    भाजणी चांगली हलविणे व त्यावर अर्धा तास झाकण ठेवून द्यावे

  6. 6

    अर्ध्या तासाने भाजणी मळून घ्यावे नंतर चकली पात्राने चकल्या पाडून घ्याव्यात व तेलात तळाव्यात

  7. 7

    तेल तापत टाकावे तेल तापले कीचकली तेलात टाकताना गॅस मोठा ठेवावा मग बारीक करावा

  8. 8

    अश्या सगळ्या चकल्या तळून घ्याव्यात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Pallavi Musale
Pallavi Musale @Pallavi74
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes