रताळ्याचा कीस (ratyalacha kees recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#GA4 #week11
स्वीट पोटॅटो ही थीम घेऊन मी रताळ्याचा कीस बनवला आहे. आज एकादशी आहे. उपवासासाठी हा कीस मी बनवला आहे.

रताळ्याचा कीस (ratyalacha kees recipe in marathi)

#GA4 #week11
स्वीट पोटॅटो ही थीम घेऊन मी रताळ्याचा कीस बनवला आहे. आज एकादशी आहे. उपवासासाठी हा कीस मी बनवला आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15मिनिट
2व्यक्तीसाठी
  1. 1मोठ रताळं
  2. 4-5हिरव्या मिरच्या
  3. 2 टेबलस्पूनतूप
  4. 1 टेबलस्पूनजिरं
  5. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  6. 1/2लिंबू
  7. 1 टेबलस्पूनसाखर
  8. 1/2 टेबलस्पूनमीठ
  9. 2 टेबलस्पूनदाण्याचा कुट

कुकिंग सूचना

10-15मिनिट
  1. 1

    रताळं स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्या. मिरच्या बारीक चिरून घ्या. कोथिंबीर बारीक चिरून घ्या.

  2. 2

    गॅस वर मध्यम आचेवर पॅन ठेवून त्यात तूप घाला. तूप तापले की त्यात जिरं, हिरवी मिरची घाला. ते तडतडल्यावर त्यात रताळ्याचा कीस घाला. सर्व एकत्र मिक्स करून घ्या. पॅन वर झाकण ठेवून मंद आचेवर पाच ते सात मिनिट झाकून ठेवा.

  3. 3

    रताळं शिजल्या वर त्यात दाण्याचा कुट घाला. मीठ, थोडी साखर आणि लिंबू पिळून दोनतीन मिनिट चांगल ढवळून घ्या.रताळ्याचा कीस तयार.वरून कोथिंबीर घालून सजवा. दह्याबरोबर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes