उपवासाचे रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)

Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892

#GA4 #week11
Sweet potato हे कीवर्ड घेऊन मी उपवासाचे रताळ्याचे कटलेट ही रेसिपी केली आहे.

उपवासाचे रताळ्याचे कटलेट (ratalyache cutlet recipe in marathi)

#GA4 #week11
Sweet potato हे कीवर्ड घेऊन मी उपवासाचे रताळ्याचे कटलेट ही रेसिपी केली आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

2 तास
3 माणसांसाठी
  1. 1/2 किलोरताळी
  2. 2 टेबलस्पूनहिरव्या मीरचीचा ठेचा
  3. 2 टेबलस्पूनआल्याचा ठेचा
  4. 2 टेबलस्पूनसाबुदाणा पीठ
  5. 2 टेबलस्पूनवरीच्या तांदळाचे पीठ
  6. 1/4 कपशेंगदाण्याचे कुट
  7. 1 टेबलस्पूनमीठ
  8. 1 टेबलस्पूनसैंधव मीठ
  9. 1 टेबलस्पूनजीरे
  10. 2 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  11. 1/4 टेबलस्पूनपांढरी मिरपूड
  12. 1 टेबलस्पूनतिखट
  13. 1/2लिंबाचा रस

कुकिंग सूचना

2 तास
  1. 1

    प्रथम रताळी स्वच्छ धुवून 5 मिनीटे पाण्यात उकडून घ्यावीत. उकडलेली रताळी किसून घ्यावी. इतर सर्व साहित्य वाटी मध्ये काढून घ्यावे.

  2. 2

    एका भांड्यात रताळ्याचा कीस घालावा. त्यात मीरचीचा व आल्याचा ठेचा घालावा.

  3. 3

    त्यात तिखट, मिरपूड व मीठ घालावे.

  4. 4

    जीरे, सैंधव मीठ व शेंगदाणा कूट घालावे.

  5. 5

    त्यात साबुदाणा पीठ, वरीचे पीठ व कोथिंबीर घालावी.

  6. 6

    लिंबाचा रस घालून मिश्रण एकजीव करावे. ह्या मिश्रणाचे हवे त्या आकाराचे कटलेट तयार करून घ्यावेत.

  7. 7

    गॅसवर एका कढईत तेल गरम करायला ठेवावे. तेल गरम झाले कि त्यात एक-एक करून कटलेट सोडावे व लालसर रंगावर तळून घ्यावेत. तळलेले कटलेट टिश्यू पेपरवर काढून ठेवावे.

  8. 8

    तयार कटलेट डीश मध्ये काढून हिरव्या चटणी बरोबर खायला द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ashwinee Vaidya
Ashwinee Vaidya @cook_26089892
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes