गाजर हलवा रबडी केक ट्रायफल (gajar halwa rabdi cake trifle recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

कुकपॅड मराठी वरील ही माझी पहिलीच रेसिपी आहे. नेहमी वेगळं काहीतरी करून बघत असते. गाजरापासून काही तरी नवीन रेसीपी करून बघावी असे वाटत होते. विचार करता करताच ही रेसिपी सुचली...😊
हि रेसिपी चवीला एकदम भन्नाट लागते.

गाजर हलवा रबडी केक ट्रायफल (gajar halwa rabdi cake trifle recipe in marathi)

कुकपॅड मराठी वरील ही माझी पहिलीच रेसिपी आहे. नेहमी वेगळं काहीतरी करून बघत असते. गाजरापासून काही तरी नवीन रेसीपी करून बघावी असे वाटत होते. विचार करता करताच ही रेसिपी सुचली...😊
हि रेसिपी चवीला एकदम भन्नाट लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ +१/२ तास
६ जणांसाठी
  1. मावा केक साठी साहित्य:
  2. 1 (1/2 कप)मैदा
  3. १ कप पिठीसाखर
  4. 1/2 कपदही
  5. 1/2 कपमिल्क पावडर
  6. 1 (1/4 कप)दूध
  7. 1 टीस्पून .मावा इसेन्स किंवा वेलची पूड
  8. 1 टीस्पून .बेकिंग पावडर
  9. १/२ टीस्पून बेकिंग सोडा
  10. सुका मेवा आवडीप्रमाणे
  11. 1 टेबलस्पून बटर
  12. रबडीसाठी साहित्य
  13. 1/2 लिटर फुल क्रिम दूध
  14. 1 कपसाखर
  15. टीस्पून वेलचीपूड
  16. 1/4 कपमिल्क पावडर
  17. सुकामेवा आवडीप्रमाणे
  18. गाजर हलव्यासाठी लागणारे साहित्य
  19. 1/2 किलो गाजर किसून
  20. आवडीप्रमाणेसाखर
  21. २ टीस्पून वेलची पूड
  22. 1 वाटीदूध
  23. १ वाटी व्हिपिंग क्रिम

कुकिंग सूचना

१ +१/२ तास
  1. 1

    प्रथम इस्टंट मावा बनवून घेऊ. पॅनमधे १ टे.स्पू. १/४ कप दूध,१/२ कप मिल्क पावडर एकत्र करून मध्यम आचेवर घट्ट गोळा होईपर्यंत परतून घ्या. घट्ट गोळा तयार झाला की मावा तयार.

  2. 2

    केकचे बॅटर- दही आणि पिठीसाखर व्यवस्थित फेटून घ्या.नंतर मैदा,बेकिंग पावडर, बेकिंग सोडा, दूध इसेन्स घालून व्यवस्थित मिक्स करा. शेवटी तयार मावा चुरून घाला आणि बॅटर एकजीव करा‌.

  3. 3

    बेकिंग टीन बटर लावून ग्रीस करून घ्या.आणि मैद्याने डस्ट करा. आणि हे मिश्रण ओतून घ्या.

  4. 4

    कुकर १० मि.प्रिहिट करून घ्या.४० ते ४५ मि. स्केलो फ्लेम वर बेक करा.

  5. 5

    ४० ते ४५ मिनिटांनंतर केक तयार होईल.

  6. 6

    रबडीसाडी - प्रथम दूध उकाळायला ठेऊन द्या.साधारण अर्ध्या तासानंतर दूध अर्धे झालेले असेल.

  7. 7

    नंतर त्यात साखर, मिल्कपावडर, वेलची पूड,सुकामेवा घालून रबडी सतत ढवळत राहा. काही वेळातच लच्छेदार,दाटसर रबडी तयार होईल.

  8. 8

    गाजर हलव्यासाठी - गाजर किसून तो चमचाभर तुपात परतून घ्या. त्यात साखर वेलची पूड,दूध घालून परतून घ्या.

  9. 9

    मिश्रण आटत आले की त्यात सुकामेवा घाला. गाजर हलवा तयार.

  10. 10

    व्हिपिंग फेटून घ्या‌. पाईपिंग बॅगमध्ये भरून घ्या.

  11. 11

    आता सर्व्हिंग करायचे तो ग्लास घेऊन त्यात प्रथम केकचे तुकडे मग वरून रब्बीचा लेअर,मग वरून गाजर हलवा असे दोन लेकरं तयार करून शेवटी व्हिंपिंग क्रिमने सजवून वरून‌ चेरी किंवा सुकामेव्याने सजवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes