शाही गाजर हलवा (shahi gajar halwa recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#EB7
#W7

नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना गोड गोड शुभेच्छा!!😊😊🎉🎊🎇🎆
नवीन वर्षाची सुरुवात गोडाधोडाने झालीच पाहिजे नाही का?😊
भारतात हिवाळ्याच्या दिवसांत आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे गाजराचा हलवा.
सर्वच वयोगटातील लोकांना गाजराचा हलवा आवडतो. या काळात लाल चुटूक गाजर मोठ्या प्रमाणात येतात. ते गाजर किसून त्यात तूप, साखर दूध किंवा मावा, नट्स घालून केलेला हा हलवा अतिशय चविष्ट लागतो. तो करायला मुबलक वेळ जरी लागत असला तरी चव चांगली असल्याने केलेल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटते...😊😋😋
पाहूयात रेसिपी .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
४ जणांसाठी
  1. 1 किलोलाल गाजर
  2. 1 कपसाखर
  3. 1/2 लिटरफुल फॅट मिल्क
  4. 20 ग्रॅममिल्क पावडर
  5. वेलचीपूड आवडीनुसार
  6. काजू,बदाम,पिस्ता,मनूका आवडीप्रमाणे
  7. 2 टेबलस्पूनतूप/ गरजेनुसार

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    कढईत तूप घालून सुकामेवा २ मि.परतून घ्या. यामुळे हलव्यामधे सुकामेवा चवीला खूप छान लागतो.

  2. 2

    गाजर छान किसून घ्या.

  3. 3

    त्याच कढईत तूप घालून गाजराचा किस छान परतून घ्या.

  4. 4

    झाकण ठेवून किस १० मि.मध्यम आचेवर वाफवून घ्या.

  5. 5

    त्यामधे कच्च दूध घालून छान मिक्स करून घ्या. कच्च्या दूधामुळे हलवा दाणेदार बनतो.

  6. 6

    दूध थोडे आटत आले की त्यात साखर घालावी. हलवा छान परतून आटवून घ्यावा.

  7. 7

    नंतर त्यात मिल्कपावडर, वेलचीपूड घालावी.व गुठळ्या होऊ न देता.परतून घ्यावे.

  8. 8

    अशाप्रकारे हलवा सतत परतून आटवून घ्यावा. व शेवटी सुकामेवा घालून सर्व्ह करावा‌. व आनंद घ्यावा...😍😋😋

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes