मायक्रोवेव्ह चोकलेट चीप्स केक (microwave chocolate chips cake recipe in marathi)

Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012

#GA4 #week13
Choco chips या क्लूनुसार मी केकची रेसिपी पोस्ट केली आहे.
एकदम सोपी रेसिपी आहे 4 मिनिटांत हा केक मायक्रोवेव्ह मध्ये बेक होतो आणि खूप छान होतो..

मायक्रोवेव्ह चोकलेट चीप्स केक (microwave chocolate chips cake recipe in marathi)

#GA4 #week13
Choco chips या क्लूनुसार मी केकची रेसिपी पोस्ट केली आहे.
एकदम सोपी रेसिपी आहे 4 मिनिटांत हा केक मायक्रोवेव्ह मध्ये बेक होतो आणि खूप छान होतो..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 1/2 कपमैदा
  2. 1/2 कपसाखर
  3. 3 टेबलस्पूनकोको पावडर
  4. 1 टीस्पूनबेकिंग पावडर
  5. 1/4 टीस्पूनइन्संट काॅफी
  6. 2 पिंचमीठ
  7. 2अंडी
  8. 3 टेबलस्पूनगरम दूध
  9. 4& 1/2 टेबलस्पून अन सॉल्टेड बटर
  10. 1 टीस्पूनव्हनिला इन्सेंस
  11. 1 टेबलस्पूनचोकलेट चीप्स
  12. 1/2 कपचोकलेट चीप्स (चोकलेट साॅससाठी-ऑप्शनल)
  13. 1/3हेवी विपिग क्रीम (चोकलेट साॅससाठी-ऑप्शनल)

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    हेवी विपिग क्रीम गरम करावे आणि त्यात चोकलेट चीप्स घालून मिक्स करावे तयार चोकलेट साॅस डेकोरेशनसाठी वापरावे. मायक्रोवेव्ह सेफ बाऊलला बटर लावून घ्यावे. एका वाटी मध्ये बटर वितळून घ्यावे त्यात गरम दूध व्हनिला इन्सेंस आणि काॅफी घालून मिक्स करावे.(अन सॉल्टेड बटर वापरणार असेल तर 2 पिंच मीठ बटरमध्ये घालावे आणि जर सॉल्टेड बटर वापरले असेल तर मीठ घालू नये)

  2. 2

    केक करण्यासाठी बाऊलला बटर लावून घ्यावे. एका भांड्यात मैदा साखर कोको पावडर बेकिंग पावडर चाळून घ्या त्यात अंडी बटर- दूधाचे मिश्रण घालावे आणि एकत्र करून घ्यावे.

  3. 3

    यात चोकलेट चीप्स घालून एकत्र मिक्स करावे बटर लावलेल्या बाउलमध्ये घालून 2 मिनिटे मायक्रोवेव्ह करावे चेक करावे आणि जर पूर्ण शिजला नसेल तर पुन्हा 2 मिनिटे मायक्रोवेव्ह करावे.

  4. 4

    मायक्रोवेव्ह ओव्हन मधून बाहेर काढून 5 मिनिटे प्लस्टिक बॅग नी / किचन नॅपकिन नी झाकून ठेवावे आणि एका डिश मध्ये काढून घ्यावे

  5. 5

    चोकलेट साॅसनी आणि चोकलेट चीप्सनी डेकोरेशन करावे आणि केक सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rajashri Deodhar
Rajashri Deodhar @RBD12072012
रोजी
I Love cooking.. 😋
पुढे वाचा

Similar Recipes