चॅाकलेट केक (chocolate cake recipe in marathi)

Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
Mumbai

#GA4 #week7

# breakfast 🧇
#फसलेल्या केकची कहाणी
मागील १५-२० दिवस आम्ही सर्व विचित्र भितीतून जात होतो, म्हणजे कोविड नावाच्या भयाण राक्षसाने आमच्या घरात प्रवेश केला , आणि आम्ही सर्व पॅाजिटीव झालो, त्यावेळेस एक अनुभव आला की नेहमीच पॅजिटीव असणे चांगले नाही😂 असो .... तर बाबा म्हणजे माझे सासरे हॅास्पिटलमध्ये होते, आणि उर्वरित आम्ही माईल्ड पॅाजिटीव असल्याने घरीच कॅारंटाइन होतो. माझ्या पाच वर्षाच्या मुलाने हट्ट धरला की ‘ आबा ज्या दिवशी घरी येतील, तेव्हा त्यांना वेलकम करण्यासाठी मम्मा स्पेशल केक हवा.’ त्याची इच्छा मोडणे काही शक्य नव्हते . काल सकाळी बाबांना डिस्चार्ज मिळाला आणि मी व सर्वज्ञ केकच्या तयारीस लागलो. सर्व सेट करून केक मोल्ड मायक्रोवेव मध्ये सरकवला आणि मायक्रोवेव ने कोळश्याचे इंजिन असलेल्या अगिनगाडीसारखे ‘धडक धडक’ आवाज करण्यास सुरूवात केली, शेवटी तो मोल्ड बाहेर काढून केकच बॅटर कुकरच्या भांड्यात सरकले आणि उर्वरित कार्यक्रम पूर्ण झाला. त्या केकचा खरा गोडवा हाच होता की ‘आज आबा घरी येणारं’... आजोबा-नातू च्या प्रेमळ नात्याची ही केक कहाणी सुफळ संपन्न...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३५ मिनिटे
४ व्यक्तींसाठी
  1. 1 कपमैदा
  2. 3/4 कपसाखर
  3. 1/4 कपतेल
  4. 1/2 कपदूध
  5. 2अंडी
  6. 1 टीस्पूनबेकींग पावडर
  7. 1 टीस्पूनबेकिंग सोडा
  8. 1 टीस्पूनवॅनिला इसेंस
  9. चिमुटभर मीठ
  10. 4डेरी मिल्क
  11. 2 टीस्पूनकोको पावडर
  12. आवडत असल्यास काजू बदाम

कुकिंग सूचना

३५ मिनिटे
  1. 1

    वरील साहित्य खालीलप्रमाणे आहे. काम झटपट होण्यासाठी मी मिक्सरचे भांडे वापरले आहे.

  2. 2

    एक एक करून सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात एकत्र केले. अंड असल्यामुळे वॅनिला इसेंस अवश्य वापरा, म्हणजे त्याचा स्मेल जाईल. तेलाऐवजी बटर वापरीत असल्यास मीठ अवॅाइड करा.

  3. 3

    कुकरमध्ये जाळी ठेवून कुकरला प्री हीट करण्यासाठी ठेवा. सर्व अन्नपूर्णांना विनंती की मी प्रथमच कुकरमध्ये केक केला, काही बदल असल्यास मला नक्की सांगा.

  4. 4

    कुकरच्या भांड्यात सर्व मिश्रण घेऊन ते कुकर मध्ये ठेवा, कुकरला शिट्टी लावू नका. २०-२५ मिनिटांनी केक चेक करा. गॅस मंद आचेवर असू द्या.

  5. 5

    केक थंड झाल्यावर प्लेटमध्ये घेऊन कट करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gautami Patil0409
Gautami Patil0409 @cook_19582560
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes