पावभाजी.. (pav bhaji recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#स्नॅक्स
बच्चाकंपनी च्या आवडीची,आणि सर्वांची ऑल टाइम फेवरेट असलेली रेसिपी म्हणजे *पावभाजी*....💃 💕

पावभाजी.. (pav bhaji recipe in marathi)

#स्नॅक्स
बच्चाकंपनी च्या आवडीची,आणि सर्वांची ऑल टाइम फेवरेट असलेली रेसिपी म्हणजे *पावभाजी*....💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५० मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. १५० ग्राम फुलकोबी
  2. १०० ग्राम पोटॅटो
  3. १०० ग्राम शिमला मिरची
  4. १०० ग्राम हिरवे वाटाणे
  5. 3मोठे टोमॅटो
  6. 3मोठे कांदे
  7. 1/2गाठा लसूण
  8. १/२ कप कोथिंबीर
  9. 2पॅकेट पावभाजीचे पाव
  10. 1पॅकेट अमुल बटर
  11. 2-3 टेबलस्पूनपावभाजी मसाला
  12. 1 टीस्पूनहळद
  13. 1 टेबलस्पूनधनेपावडर, जिरापावडर
  14. 2-3 टेबलस्पूनतेल
  15. 2 टेबलस्पूनतिखट
  16. 1लिंबू
  17. मीठ चवीनुसार
  18. आवश्यकतेनुसार पाणी

कुकिंग सूचना

५० मिनिटे
  1. 1

    पावभाजी साठी लागणारे सर्व साहित्य तयार ठेवावे.

  2. 2

    त्यानंतर सर्व भाज्या स्वच्छ धुऊन बारीक चिरून (एकदम बारीक हि नको) घ्याव्यात. चिरलेल्या भाज्या कुकर मध्ये एक ते दोन शिट्या देऊन उकडून घ्याव्यात. भाज्या एकदम मऊ शिजल्या पाहिजे.

  3. 3

    आता या सर्व भाज्या मॅशरच्या साह्याने मॅश करून घ्याव्यात. टोमॅटो उकडून त्याची प्युरी करून घ्यावी.

  4. 4

    एक पसरट पॅन घेऊन, त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल व आठ ते दहा टेबलस्पून बटर घाला. त्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्या.कांदा चांगला ब्राऊन होऊ द्या.(म्हणजे त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यावे.) आता आलं-लसूण पेस्ट घालून एक मिनिट होऊ द्या.

  5. 5

    आता तिखट, मीठ, धने पावडर, जीरा पावडर, पावभाजी मसाला घालून एक मिनिट होऊ द्या. नंतर त्यामध्ये टोमॅटो प्युरी घाला व चांगले मिक्स करून घ्या.

  6. 6

    शिजवून घेतलेल्या सर्व भाज्या यात घाला. व झाकण ठेवून एक मिनिट होऊ द्या. आता यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घाला. (जास्त पातळ करू नका) पाच मिनिटे भाजी शिजवून घ्या.

  7. 7

    आता वरून बटर व कोथिंबीर घालून एक मिनिट होऊ द्या. त्यानंतर गॅस बंद करा. तयार आहे आपली पावभाजीची भाजी तयार.

  8. 8

    भाजीसोबत देण्यासाठी, पावला मधोमध चाकूच्या मदतीने असे कापा की, तो दुसऱ्या बाजूने जोडून राहील. तव्यावर थोडे बटर घालून दोन्ही साईड ने पावाला शेकून घ्या.

  9. 9

    पाव व भाजी प्लेट मध्ये काढून, बारीक चिरलेला कांदा, लिंबाची फोड व बटर घालून गरमागरम सर्व्ह करा *पावभाजी*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

Similar Recipes