वडा पाव (vada pav recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#स्नॅक्स वडापाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्ट्रीट फुड आहे. चमचमीत असा हा वडापाव लहान थोरांच्या आवडीची डिश आहे .तोंडाला पाणी सुटलं ना? या मग खायला....

वडा पाव (vada pav recipe in marathi)

#स्नॅक्स वडापाव हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्ट्रीट फुड आहे. चमचमीत असा हा वडापाव लहान थोरांच्या आवडीची डिश आहे .तोंडाला पाणी सुटलं ना? या मग खायला....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1-2 तास
2 सर्व्हिंगस
  1. 3बटाटे मोठ्या आकाराचे
  2. 5-6पाकळ्या लसूण
  3. 5-6हिरव्या मिरच्या
  4. 1आलं
  5. 7-8पान कढीपत्ता
  6. 1 टेबलस्पूनबारीक चिरलेली कोथिंबीर
  7. 60 ग्रॅमबेसन पीठ
  8. 1-2 टीस्पूनतांदूळ पीठ
  9. चिमूटभरबेकिंग सोडा
  10. 1-2 टीस्पूनलिंबूरस
  11. 1-2 टीस्पूनहळद
  12. मीठ चवीपुरते
  13. तेल तळण्याकरता

कुकिंग सूचना

1-2 तास
  1. 1

    वड्याचं कोटिंग
    बेसन पीठ घ्या. त्यांत तांदूळ पीठ मिसळा. चवीप्रमाणे मीठ, 1/4 टीस्पून हळद,चिमूटभर बेकिंग सोडा घालून, पाणी टाकून पीठ छान कालवा (साधारण अर्धा वाटी पाणी लागेल, हवं तसं पाणी टाका) पिठात गाठी होऊ देऊ नका कोटिंग चे पीठ बाजूला ठेवा.
    हिरव्या मिरच्या आलं लसूण मिक्सरवर जाडसर फिरवून काढा.

  2. 2

    बटाट्याची भाजी
    बटाटे कुकरमध्ये उकडा. त्याच्या फोडी करा. कढईत दीड टेबलस्पून तेलाची फोडणी ठेवा.त्यांत मोहरी टाका.ती तडतडल्यावर, कढीपत्ता, हिरवी मिरची, आलं- लसूण पेस्ट टाका. 1/4 टीस्पून हळद टाका.ते परतल्यानंतर त्यांत बटाट्याच्या फोडी टाका. चवीपुरते मीठ, 1/2 टीस्पून लिंबूरस टाकून,भाजी छान परतून घ्या.ती गार झाल्यावर त्याचे गोल गोळे करा

  3. 3

    वडे तळण्यासाठी कढईत ते तापवा.तेल कडकडीत तापल्यानंतर, भाजीचा गोल गोळा कोटींगच्या कालवलेल्या पिठात टाकुन, चमच्याने तो पिठात छान घोळा व चमच्याने तेलात सोडा. छान सोनेरी रंगाचे वडे झाल्यावर,प्लेटमध्ये काढा.

  4. 4

    लादीच्या पावाचे मधून सुरीने दोन भाग करा व त्यात गरम गरम वडे ठेवा. हाताने पाव हलकासा दाबा व तो सर्व्ह करा.त्याबरोबर शेंगदाण्याची चटणी व तळलेल्या दोन-तीन हिरव्या मिरच्या पण द्या.
    ठोकू द्या,चमचमीत असा वडापाव....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes