वडा पाव (vada pav recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#स्नॅक्स

#साप्ताहिक_ स्नॅक्स_ प्लॅनर

#बुधवार_वडा पाव

"वडापाव"

वडापाव हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ....
मला वडापाव खुप आवडतो,पण घरी बनवलेला..
Home made is best..

वडा पाव (vada pav recipe in marathi)

#स्नॅक्स

#साप्ताहिक_ स्नॅक्स_ प्लॅनर

#बुधवार_वडा पाव

"वडापाव"

वडापाव हा सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ....
मला वडापाव खुप आवडतो,पण घरी बनवलेला..
Home made is best..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचेचाळीस मिनिटे
पाच जणांसाठी
  1. 700 ग्रॅमबटाटे
  2. 2 कपबेसन पीठ
  3. 10हिरव्या मिरच्या
  4. 2 इंचआले
  5. 7आठ लसूण पाकळ्या
  6. 1 टेबलस्पूनजिरं
  7. 1 टेबलस्पूनओवा
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  10. 1 वाटीसुके खोबरे
  11. आवडीनुसार कोथिंबीर

कुकिंग सूचना

पंचेचाळीस मिनिटे
  1. 1

    बटाटे स्वच्छ धुवून एका भांड्यात ठेवून दोन कप पाणी घालून कुकरला चार शिट्या काढुन घ्याव्यात

  2. 2

    बटाटे पुर्ण थंड झाल्यावर साल काढून बारीक तुकडे करून घ्यावेत.. मिरची,आले,लसूण, कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे.. व सगळे एकत्र करुन त्यात चवीनुसार मीठ घालावे.. ओवा हातावर कुस्करून घालावा.

  3. 3

    मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे गोळे करून घ्यावेत...

  4. 4

    एका मोठ्या भांड्यात बेसन पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ, अर्धा टीस्पून हळद घालून पाणी घालून चांगले चमच्याने हलवुन घ्यावे गुठळ्या होऊ नये याची काळजी घ्यावी..

  5. 5

    कढईत तेल घालून गरम झाल्यावर बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे बेसन पीठात घोळवून तेलात सोडावे व छान तळून घ्या.. अशाप्रकारे सगळे वडे तळून घ्यावेत..

  6. 6

    सुक्या खोबऱ्याचे काप करून घ्यावेत त्यात चार पाच लसणाच्या पाकळ्या व मीठ,लाल तिखट,घालून मिक्सरमध्ये वाटून घ्यावे..... वडापाव सोबत खाण्यासाठी लाल चटणी तयार..

  7. 7

    गरमागरम वडे,पाव,लाल चटणी व तळलेली हिरवी मिरची सोबत सर्व्ह करावे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes