रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#स्नॅक्स

रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

#स्नॅक्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनीटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपजाड रवा
  2. 1 टीस्पूनहिरवी मिरची चिरलेली
  3. 1/2 टीस्पूनकिसलेले आले (ऐच्छिक)
  4. 1 टेबलस्पूनतेल
  5. 1 टीस्पूनमीठ
  6. 1 टीस्पूनइनो
  7. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  8. 1-1/2 कप पाणी
  9. फोडणी साठी 👇
  10. 1 टेबलस्पूनतेल
  11. 1 टेबलस्पूनमोहरी
  12. 1/2 टीस्पूनहिंग
  13. 1/2हिरवी मिरची
  14. 3/4कढीपत्ता
  15. 3 टेबलस्पूनकोथिंबिर

कुकिंग सूचना

30मिनीटे
  1. 1

    रवा घेउन त्यात अर्धा कप थोडे थोडे पाणी घालून मीठ घालून 15मिनिट बाजूला झाकून ठेवणे.

  2. 2

    मिरची, आले चिरून घेणे. ज्या मधे ढोकळा करणार त्या भांड्याला थोडे तेल लावून घेणे. भिजलेला रव्यामधे आल,मिरची,लिंबाचा रस घालणे जाड असेल तर त्यात पाणी घालणे व त्यात इनो घाला नि अॅक्टीवेट होण्यासाठी चमचाभर पाणी घाला छान बॅटर मिसळून घ्या नि ढोकळा करणार त्या भांड्यात ओता नि 15 मिनिटे इडलीकुकर मधे वाफवून घ्या.

  3. 3

    थोडा थंड झाला कि तुकडे करा व एका ताटात काढा.आता फोडणीसाठी कढईत तेल तापत ठेवावे तापले कि त्यात मोहरी घाला तडतडली कि हिंग,कढीपत्ता,मिरची घाला हि फोडणी सगळीकडे नीट ढोकळ्यावर ओता.

  4. 4

    ढोकळा तयार आहे.खायला द्या वाटल्यास चटणी करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes