रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
Solapur

#स्नॅक्स

रवा ढोकळा (rava dhokla recipe in marathi)

#स्नॅक्स

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2 तास
6 सर्व्हिंगस
  1. 200 ग्रॅमबारीक रवा
  2. 1/2 टीस्पून लाल तिखट
  3. 1/2 टीस्पूनहळद
  4. 2 टीस्पूनसाखर
  5. मीठ चवीपुरते
  6. 1 टेबलस्पूनतीळ
  7. चिमूटभरहिंग
  8. 1 टीस्पूनइनो
  9. 200 मि.ली. कोमट पाणी
  10. 100 मि.ली.ताक
  11. 1 टीस्पून लाल मिरच्या
  12. 1/2 टेबलस्पून तेल फोडणीसाठी

कुकिंग सूचना

1/2 तास
  1. 1

    रव्यात तिखट,मीठ, हळद, साखर, हिंग पूड टाका. कोमट पाणी व ताक घालून रवा छान भिजवा. ते मिश्रण 2 - 3 तास भिजू द्या. कढईत पाणी घेऊन गॅसवर ठेवा. त्यात रिंग ठेवा.पाणी उकळू लागले की, ज्या ताटात किंवा डब्यात ढोकळा लावायचा आहे, त्याला तेलाचे ग्रीसिंग करुन ते रिंग वर ठेवा.

  2. 2

    रव्याचे भिजलेले मिश्रण पुन्हा नीट मिक्स करा. (आवश्यकतेनुसार पाणी टाकू शकता)आता त्यांत 1 टीस्पून इनो घाला व मिश्रण छान फेटा. कढईत ठेवलेल्या ताटात ते मिश्रण पटकन ओता. हे सर्व घाईने करा.(नाहीतर ढोकळा फुगत नाही) कढईवर झाकण झाका. 12 ते 13 मिनिटात ढोकळा तयार होईल.पण झाकण न उघडता 5 मिनिटे तसेच राहू द्या.

  3. 3

    5 मिनिटानंतर प्लेट बाहेर काढून, ती छान गार होऊ द्या.(गरम असतानाच तो कापला असता, त्याचा चुरा होऊ शकतो.)आता चाकूने त्याचे चौक तुकडे पाडा.

    गॅसवर तेलाची खमंग फोडणी ठेवा.त्यात मोहरी, जीरे टाका. ते तडतडले कीं, हिंग पूड, तीळ, कढीपत्ता, लाल मिरची टाका. त्यात ढोकळा टाका. हलक्या हाताने छान मिक्स करा. व 2 - 4 मिनिटे झाकून ठेवा.छान वाफ येईल.

    अश्या रीतीने खमंग व जाळीदार ढोकळा तयार झाला. त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाका. व प्लेट मध्ये सजवून सर्व्ह करा. सॉस, हिरवी चटणी किंवा चिंच गुळाची चटणी वाढा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Madhuri Shah
Madhuri Shah @madhurishah
रोजी
Solapur

Similar Recipes