हर्बल लेमन टी.. (herbal lemon tea recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#GA4
#week15
# keywordHarba
lआज-काल आरोग्याबाबत लोक खूप जागृत झाले आहेत. म्हणून चहा, कॉफी ऐवजी हर्बल ग्रीन टी घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.
हर्बल टी हे एक प्राकृतिक पेय आहे. सर्दी, खोकला पासून सुट्टी देणारा, कफ कमी करणारा गुणकारी हर्बल टी सर्वांसाठी खूपच उपयुक्त असा आहे.. गळ्यातील खसखस असल्यास किंवा पोटाच्या संबंधित समस्या असल्यास हर्बल ग्रीन टीचा खूप फायदा होतो...
तसेच शारीरिक थकवा, डोकेदुखी, ताणतणाव इत्यादी समस्या कमी होण्यास देखील हर्बलटीची आपल्याला मदत होते..
💃💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५ मिनिटे
एका व्यक्तीसाठी
  1. 1 कपपाणी
  2. चिमूटभरव्हाईट पेपर पावडर
  3. 1/4 टीस्पूनचहापत्ती
  4. 2-3पदीन्याचे पाने
  5. 2-3तुळशीची पाने
  6. 1/2 इंचअदरक
  7. 1/2 टिस्पुनलिंबू रस
  8. चिमूटभरहळद

कुकिंग सूचना

५ मिनिटे
  1. 1

    गॅस वरती छोटे पातेले ठेवून, त्यामध्ये एक कप पाणी घालावे. त्यात अद्रक, तुळशीची पाने, पदीन्याचे पाने व हळद, मीरे पावडर घालून पाण्याला उकळी येऊ द्यावी.

  2. 2

    पाण्याला उकळी आली की गॅस बंद करावा. या पाण्यामध्ये चहा पत्ती घालून झाकण ठेवून, दोन मिनिटे झाकून ठेवावे.

  3. 3

    नंतर त्यामध्ये लिंबू रस पिळावा. व गरमागरम कपामध्ये ओतून *हर्बल लेमन टी* चा आस्वाद घ्यावा. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये गुळ देखील घालू शकता... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

Similar Recipes