दावणगिरी लोणी स्पंज डोसा (Davangiri Loni Sponge Dosa Recipe In Marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#BRK... डोसा इडली मिश्रण तयार असेल, आणि जास्त काही करण्याचा कंटाळा आला, तर, झटपट होणारा, आणि सोबत जास्त काही न लागणारा, फक्त चटणी किंवा सॉस सोबत खाता येणारा, दावणगिरी लोणी स्पांज डोसा...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिट
2 सर्व्हिंग्ज
  1. 3भाग तांदूळ
  2. 1भाग उडीद डाळ
  3. 1 टीस्पूनमेथी दाणे
  4. चवीनुसारमीठ
  5. बटर किंवा लोणी

कुकिंग सूचना

20 मिनिट
  1. 1
  2. 2

    आता डोसा करण्यासाठी, आवश्यक तेवढे मिश्रण घेवून, त्यात चवीनुसार मीठ टाकावे. आणि चांगले फेटून घ्यावे.

  3. 3

    आता गॅस वर एक नॉनस्टिक पॅन ठेवून, त्यावर थोडेसे तेल टाकून, ते चांगले पसरवून घ्यावे. मी यासाठी, माझे कडे असलेले, नॉनस्टिक तडका पॅन वापरले आहे. त्यामुळे अगदी एकसारखे आकाराचे झाले आहेत डोसे. आता गरम झालेल्या पॅन मध्ये, मिश्रण टाकावे. चमचा न लावता जाडसर पसरवून घ्यावे. त्यावर झाकण ठेवून एक मिनिट शिजवावे.

  4. 4

    आता त्यावर बटर टाकावे. पातळ करून टाकले तरी चालेल. आणि पसरवून घ्यावे.

  5. 5

    आता डोसा परतवून घ्यावा. दोन्हीकडून भाजल्या गेला पाहिजे.

  6. 6

    अशा प्रकारे, डोसे तयार करून घ्यावे.

  7. 7

    आता हे तयार डोसे, खाण्यासाठी तयार आहे. चटणी, केचप, किंवा बटाट्याची मोकळी भाजी, यासोबत गरमागरम सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

Similar Recipes