तडका डाळ भाजी (tadka dal bhaji recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#cooksnap
#Sonal Isal Kolhe
तडका डाळ भाजी
भाजी करायची पण कोणती करायची हे सुचत नव्हते. त्यातल्या त्यात काही विशेष करायचे म्हणजे बाहेर जावे लागणार.. आणि ते शक्य नव्हते कारण एरिया सील. त्यामुळे करायचे काय.. आणि तेही आपल्या कडे जे सामग्री असेल त्यातच.. मग ठरवले आणि आपल्याच ग्रुप मधील मैत्रीण सोनल हिची रेसिपी तडका डाळ भाजी करून बघायची तिच्याच पध्दतीने पण थोडा बद्दल करून.... 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

3/4 व्यक्ती साठी
  1. 1पाव पालक
  2. 1कांदा
  3. 2टमाटर
  4. 5/6लसुण पाकळ्या
  5. 1 वाटीतूरीची डाळ
  6. 2छोटे बुटले तेल
  7. सांभार
  8. 1 टिस्पून हळद
  9. 1 टिस्पून धनेपावडर
  10. 1 टिस्पून जिरापावडर
  11. 1 टिस्पुनकाळा मसाला
  12. मीठ चवीनुसार
  13. 1 टीस्पूनलाल तिखट
  14. तडका देण्यासाठी
  15. 1/2 टीस्पूनहिंग
  16. 3 टेबलस्पूनतेल
  17. 1 टीस्पूनमोहरी.. जिरे
  18. 3/4लाल सुक्या मिरच्या

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम पॅन मध्ये तुरीची डाळ घेऊन.. ती दहा मिनिटे शिजवून घेणे. थोडी शिजत आल्यावर त्या मध्येच चिरलेली पालक टाकून पाच मिनिटे गॅस वर होऊ देणे.

  2. 2

    त्यामध्येच कापलेला टोमॅटो घालून दोन.. तिन मिनिटे शिजवून घेणे. आता आवश्यकतेनुसार पाणी टाकुन एक मिनिटासाठी होऊ देणे.

  3. 3

    आता तिन टेबलस्पून तेल गरम करून त्यात कांदा.. लसूण पेस्ट कढीपत्ता टाकून.. त्यामध्येच तिखट.. मीठ. धनेपावडर. जिरापावडर हळद हिंग टाकून दोन सेकंद होऊ देणे. व हे सर्व पालकडाळ च्या पॅन मध्ये टाकुन एक मिनिटासाठी उकळी येऊ देणे.

  4. 4

    आता गॅस बंद करायचा. नंतर एक छोटा पॅन घेऊन त्यामध्ये 2/3 टेबलस्पून तेल घालून.. तेल चांगले तापले कि त्यामध्ये जीरे.. मोहरी.. हिंग. व सुक्या लाल मिरच्या टाकून हा तडका डाळ भाजी वर टाकणे..मला थोडे झणझणीत लागत.. म्हणून मी थोडे स्पाईसी बनवले..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes