दोडक्याच्या शिरांची चटणी (dodkyacha sheeranchi chutney recipe in marathi)

Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564

दोडक्याची भाजी केली की तिची साल,शिरा फेकून न देता त्याची चटणी केली.एकदम मस्त लागते.भाकरीसोबत एकदम अप्रतिम.

दोडक्याच्या शिरांची चटणी (dodkyacha sheeranchi chutney recipe in marathi)

दोडक्याची भाजी केली की तिची साल,शिरा फेकून न देता त्याची चटणी केली.एकदम मस्त लागते.भाकरीसोबत एकदम अप्रतिम.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

५-७ मिनीटे
२-३
  1. 1 कपदोडक्याच्या शिरा
  2. 1/4 कपकोथिंबीर
  3. 2-3हिरव्या मिरच्या
  4. 1 टेबलस्पूनदाण्याचं कूट
  5. 1 टीस्पूनतीळ
  6. 1/4 टीस्पूनमीठ
  7. 1 टेबलस्पूनतेल
  8. 5-6लसूण पाकळ्या

कुकिंग सूचना

५-७ मिनीटे
  1. 1

    दोडक्याच्या शिरा तव्यावर छान परतून घेतल्या.

  2. 2

    त्यात तेल घालून,कोथिंबीर,लसूण,मिरच्या हे पण परतून घेतले.गॅस मंद ठेवला.

  3. 3

    नंतर त्यात दाण्याचं कुट,तीळ,मीठ घालून परतले.

  4. 4

    सर्व साहित्य मिक्सर मधून दोन तीन वेळा फिरवून घेतले.

  5. 5

    पुन्हा तव्यावर थोडे तेल घालून मिक्सर मधले वाटण तव्यावर छान परतले.त्यामुळे चटणी छान खमंग आणि कुरकुरीत होते.

  6. 6

    चटणी तयार झाल्यावर ती बाउल मध्ये काढून घेतली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Preeti V. Salvi
Preeti V. Salvi @cook_20602564
रोजी

Similar Recipes