दोडक्याच्या शिरांची चटणी

Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232

आपण दोडका शिरा काढून त्याची भाजी करतो. शिरा फेकून न देता त्याची अशी चटणी करावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम पदार्थ आहे.

दोडक्याच्या शिरांची चटणी

आपण दोडका शिरा काढून त्याची भाजी करतो. शिरा फेकून न देता त्याची अशी चटणी करावी ही चटणी तोंडी लावण्यासाठी उत्तम पदार्थ आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

अर्धा तास
सात ते आठ
  1. 1/2 किलोदोडका
  2. 1कांदा
  3. 1/2 टीस्पूनजिरे
  4. 1/2 टीस्पूनमोहरी
  5. 5-6 लसूण पाकळ्या
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनकांदा लसूण मसाला
  8. 1/2 टीस्पूनहळद
  9. 1/4 टीस्पूनहिंग
  10. चवीनुसार मीठ
  11. 1/4 टीस्पूनसाखर

कुकिंग सूचना

अर्धा तास
  1. 1

    प्रथम दोडका स्वच्छ धुऊन त्याच्या, शिरा काढून घ्याव्या. त्या शिरा मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्याव्या. कांदा बारीक चिरून घ्यावा. लसूण ठेचून घ्यावा.

  2. 2

    एका पॅनमध्ये तेल गरम करून, त्यात जिरे- मोहरी, लसुन, हिंग घालून चांगले परतून घ्यावे.

  3. 3

    आता त्यामध्ये कांदा घालून सोनेरी रंगावर परतून घ्यावे. त्यानंतर हळद, लाल तिखट, कांदा-लसूण मसाला, घालून परतून घ्यावे. नंतर त्यात बारीक वाटलेल्या दोडक्याच्या शिरा घालून, त्यावर मीठ आणि साखर घालावी. चांगले परतून घ्यावे. गरजेनुसार पाणी घालून चटणी शिजू द्यावी.

  4. 4

    सर्व्ह करावी दोडक्याची शिरांची चटणी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rutuja Tushar Ghodke
Rutuja Tushar Ghodke @cook_25671232
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes