ब्रेडचे गुलाबजामून (breadche gulabjamun recipe in marathi)

सरिता बुरडे
सरिता बुरडे @cook_25124896

ब्रेडचे गुलाबजामून (breadche gulabjamun recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. पाक बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  2. 1 कपसाखर
  3. दीड कप पाणी
  4. 1 टीस्पूनविलायची पावडर
  5. गुलाबजामुन बनविण्यासाठी लागणारे साहित्य
  6. 6ब्रेडचे स्लाईस
  7. 4 टेस्पूनदूध
  8. 5 मनुका
  9. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम पाक तयार करून घ्यावे. त्यासाठी एका गंजात साखर आणि पाणी घालून 5 ते 7 मिनिटे उकळायला ठेवावे. साखर विरघळल्यावर त्यात विलायची पावडर टाकावी. अश्याप्रकारे थोडा घट्ट असा पाक तयार होईल.

  2. 2

    आता सर्व ब्रेडच्या कडा कापून घ्यावे.

  3. 3

    ब्रेडचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावे आणि त्यात दूध ऍड करून हाताने मॅश करून घ्यावे.

  4. 4

    मॅश केलेल्या ब्रेडच्या तुकड्याचे छोटे छोटे गोळे बनवून त्याच्या मधोमध मनुका घालून गोळे बंद करून घ्यावे.

  5. 5

    एका कढईत तेल घालून तेल तापल्यावर ब्रेडचे गोळे तळायला टाकावे.

  6. 6

    गोळे दोन्ही बाजूंनी ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यावेत. तळून झाल्यावर लगेच गुलाबजामुन साखरेच्या पाकात मुरायला टाकून थंड करायला ठेवावे.

  7. 7

    गुलाबजामुन थंड झाल्यावर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
सरिता बुरडे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes