कोलंबी भात/ प्रॉन्स पुलाव (kolambi bhaat recipe in marathi)

Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952

कोलंबी भात/ प्रॉन्स पुलाव (kolambi bhaat recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपकोलंबी ध्या्
  2. 2 कपतांदूळ (बासमती)
  3. 2मोठे कांदे
  4. 3टोमॅटो
  5. 1/4 कपकोथिंबीर
  6. 1 टीस्पूनगरम मसाला
  7. 1 टेबलस्पून + 1 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  8. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  9. 1लिंबू
  10. 1/4 टीस्पूनहळद
  11. 1 इंचदालचिनी
  12. 2-3लवंग
  13. 7-8मिरी
  14. 3-4हिरवी वेलची
  15. 1/2 कपतेल
  16. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

45 मिनिट
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुऊन त्यात थोड पाणी घालून भिजउन ठेवावे.कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी.कोलंबी साफ करून त्यात एक टेबलस्पून लाल तिखट,एक टीस्पूनआलं लसूण पेस्ट,लिंबाचा रस,मीठ,हळद लावून मॅरीनेट करावे.

  2. 2

    कढईत तेल गरम करुन त्यात प्रथम खडा मसाला घालून त्यावर एक टेबलस्पूनआलं लसूण पेस्ट परतावी.त्यावर बारीक चिरलेला कांदा गुलाबी रंगावर परतावा.

  3. 3

    आता त्यात टोमॅटो,गरम मसाला,हळद,कोथिंबीर घालून मिक्स करून खमंग वास येईपर्यंत परतावे. आच मध्यम असावी. त्यात कोलंबी मिक्स करून एक वाफ आणावी. लागल्यास थोड पाणी घालावे.

  4. 4

    नंतर त्यात तांदूळ दाणा मोकळा होईपर्यंत परतून घ्यावा.एकीकडे चार कप पाणी गरम करण्यास ठेवावे.(तांदुळाच्या दुप्पट पाणी).तांदूळ परतून झाले की त्यात गरम पाणी, मीठ, व एक टेबलस्पून लाल तिखट घालून मिक्स करावे व मंदआचेवर झाकण लावून शिजवावे. सर्व्ह करताना बरोबर तळलेली कोलंबी भातावर घालावी.सोबत कांद्याचे रायते द्यावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Kalpana D.Chavan
Kalpana D.Chavan @cook_22945952
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes