पारंपरिक तिळगूळ लाडू (tilgul recipe in marathi)

#मकर
#तिळगुळाचे लाडू
#लाडू
तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे हळदी-कुंकू केलं जातं त्या कार्यक्रमांमध्ये तिळाच्या लाडवांचं अनन्यसाधारण महत्व असतं. काही घरांमध्ये साखरेचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण गुळाच्या पाकात करतात. सर्वसाधारणपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आज मी अगदी सोप्या पद्धतीने लाडू करायची रेसिपी शेअर करत आहे. मऊ आणि खुसखुशीत सुद्धा असा लाडू अप्रतिम लागतो.
माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात.मग नक्की करून बघा पारंपरिक तिळगूळ लाडू.
पारंपरिक तिळगूळ लाडू (tilgul recipe in marathi)
#मकर
#तिळगुळाचे लाडू
#लाडू
तिळाचे लाडू करायला अतिशय सोपे आणि बिघडण्याची शक्यता शून्य असे आहेत. आपल्याकडे संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत जे हळदी-कुंकू केलं जातं त्या कार्यक्रमांमध्ये तिळाच्या लाडवांचं अनन्यसाधारण महत्व असतं. काही घरांमध्ये साखरेचा पाक करून लाडू केले जातात तर काही जण गुळाच्या पाकात करतात. सर्वसाधारणपणे हे लाडू कडक, चिक्कीच्या गुळापासून बनवलेले असतात. पण आज मी अगदी सोप्या पद्धतीने लाडू करायची रेसिपी शेअर करत आहे. मऊ आणि खुसखुशीत सुद्धा असा लाडू अप्रतिम लागतो.
माझ्या घरी महिनाभरात किमान तीनदा हे लाडू होतात.मग नक्की करून बघा पारंपरिक तिळगूळ लाडू.
कुकिंग सूचना
- 1
तीळ मंद गॅसवर भाजून घ्यावे.
तडतडू लागले की उतरावे. - 2
सुके खोबरे थोडेसे भाजून घ्यावे.
शेंगदाणे भाजून सोलुन घ्यावे व जाडसर कुटुन घ्यावे.तीळ, खोबरे, शेंगदाणे एकत्र करून बाजूला करून ठेवावे. - 3
गूळ बारीक किसून घ्यावा.एका कढईत थोडेसे तूप घालून त्यावर गूळ घालावा. पाणी घालू नये.
- 4
मंद गॅसवर पातळ होवू द्यावा.आपल्याला एकतारी-दोनतारी पाक घ्यायचा नाही आहे. फक्त गूळ विरघळला की झाले.
- 5
गूळ विरघळला की गॅस बंद करावा व
त्यात एकत्र केलेले तीळ, खोबरे, शेंगदाणे घालावे.वेलची पूड घालून एकत्र करून घ्यावे. - 6
एका ताटात खसखस पसरावी.
तळहाताला थोडेसे तूप लावून मिश्रण गरम असतानाच लगेचच लाडू वळून घ्यावे.व ताटातील खसखशीवर घोळवावे.म्हणजे खसखस लाडूला आपोआप चिकटेल. थंड झाले की तयार लाडू हवाबंद डब्ब्यात भरून
ठेवावे. - 7
पारंपरिक तिळगूळ लाडू तयार आहेत.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
स्वादिष्ट तिळगुळ वडी (Tilgul Vadi Recipe In Marathi)
#TGR... संक्रांत आणि तिळगुळाचे नाते सर्वश्रुत आहे. यावेळी तिळगुळाचे लाडू, वड्या, पोळ्या प्रत्येक घरीच तयार केल्या जातात. मी पण केल्या आहेत सोप्या पद्धतीने, तिळगुळ वड्या.. Varsha Ingole Bele -
तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
तीळ हे उष्ण आणि तेलकट असतात त्यामुळे थंडीमध्ये त्याचा आहारात मोठ्या प्रमाणात उपयोग केला जातो तिळाचे लाडू हे बनवणे अतिशय सोपे आहेत अगदी लहान मुलेही ते बनवू शकतात चला तर हे झटपट बनणारे लाडू आपणही बनवूयात Supriya Devkar -
संक्रांति स्पेशल तीळगुळ (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#LCM1संक्रांत आली की तिळगुळाचे लाडू प्रत्येक घरात होतातच. पूर्वीच्या काळी ऋषीमुनींनी प्रत्येक ऋतूसाठी असे काही सण दिलेले आहेत की ज्यामुळे उत्साह वाढतो. नवीन वर्षातला पहिला सण म्हणून आपण संक्रांत साजरी करतो. जानेवारी महिन्यातील हुडहुडी भरवणारी थंडी आणि त्यात तीळातुन उष्मा देणारे व गुळातून गोडवा व पोषक तत्वे देणारे असे हे तिळगुळाचे लाडू शरीरासाठी आवश्यक असतात. Anushri Pai -
डिंकाचे लाडू (dinka che ladoo recipe in marathi)
#GA4#week14#LADOOथंडी आणि डिंकाचे लाडू हे जणू काही समीकरणच आहे.उष्णता वर्धक,पूर्ण पाॅवरपॅक असे हे लाडू.चलातर मग पाहूयात डिंकाचे लाडू.. Shital Muranjan -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#कुकस्नॅपवर्षाताईची गोविंद लाडू ची रेसिपी कुकस्नॅप केली आहे.धन्यवाद ताई ह्या अप्रतिम रेसिपी साठी🙏खास गोकुळाष्टमीला हे पोह्याचे लाडू बनवले जातात. कृष्णा-सुदामाची मैत्री आणि पोहे याची गोष्ट सगळ्यांना माहीत आहे. ह्या पोह्यांचा लाडूत लोह असून रक्ताभिसरण सुधारते व ऑक्सिजन पातळीही वाढवते. असे हे पौष्टिक लाडू... Manisha Shete - Vispute -
पोहे डाळव्याचे लाडू (pohe dalva ladoo recipe in marathi)
मला हे लाडू माझ्या आज्जीसासुने शिकवले आहेत.थोडी वेगळी रेसिपी आहे म्हणून मी ते केले.Rutuja Tushar Ghodke
-
रवा नारळ मलई लाडू (Rava Coconut Malai Laddoo recipe in marathi)
#रवासाखरेचा पाक न करता बनणारे सोपे लाडूसाखरेचा पाक न करता रवा नारळाचे लाडू होतात का ? नक्की होतात. बऱ्याच जणांना साखरेचा पाक नीट जमत नाही.किंवा पाक नीट होईल का याची धास्ती वाटत असते. त्यांच्यासाठी ही माझी इनोव्हेटिव्ह रेसिपी. अगदी सोपी रेसिपी आहे - ह्या लाडवात मी तुपाऐवजी मलई (साय) घातलीय. ह्यात साखरेचा पाक करावा लागत नाही. म्हणजे काही चुकणारच नाही ... बिनधास्त करा लाडू. लाडू फार स्वादिष्ट होतात. Sudha Kunkalienkar -
तिळगुळ लाडू (Tilgul Ladoo Recipe In Marathi)
#TGRहिवाळ्यात येणाऱ्या मकर संक्रांतीच्या वेळी तिळ लाडू दिले जातात. या उत्सवादरम्यान ते मित्र आणि कुटुंबामध्ये देखील वितरित केले जाते. Vandana Shelar -
मसाला दूध (masala dudh recipe in marathi)
#mfr#masaladudhहे पारंपारिक महाराष्ट्रीयन मसाला दूध सणासुदीला, हळदी कुंकू समारंभात आवर्जून केलं जातं. करायला अगदी सोपं आणि सगळ्यांच्या आवडीचं. चला तर मग पाहू याची कृती. Shital Muranjan -
तिळगुळ लाडू
#संक्रांतीतिळगुळाचे लाडू तर संक्रांतीला घरोघरी होतात माझे लाडू कसे झालेत बघा.तिळगुळ घ्या गोड गोड बोला,खास Cookpad साठी! Spruha Bari -
-
डिंकाचे लाडू (dinkache ladu recipe in marathi)
#लाडू #डिंकाचे लाडू हे पौष्टिक असतात. हिवाळा सुरू होत आहे.नक्की सर्वांनी करून बघा. Sujata Gengaje -
पारंपारिक तिळगुळ लाडू (tilgul laddu recipe in marathi)
#मकर संक्रांतमकर संक्रांती हा भारताचा मुख्य सण आहे.पौष महिन्यात जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा हा सण साजरा केला जातो. सध्याच्या शतकात हा सण जानेवारी महिन्याच्या चौदाव्या किंवा पंधराव्या दिवशी येतो, या दिवशी सूर्य धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतोमकर संक्रांतीच्या निमित्ताने तिळगुळ खाण्याची आणि खायला देण्याची परंपरा आहे.तिळगुळ लाडू विवीध भागात वेगवेगळया पद्धतीनें केले जातात गावाला हे लाडू करतातपण आम्ही येथे राहतो तिथे हे लाडू फार क्वचित करतात येथे फक्त पाकाचे लाडू करतातमकर संक्रांत या सणाला सर्वात जास्त मजा असतो तो तिळगुळाचा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला असे म्हणत किती तरी लाडू आपण फस्त करतो. पण या हंगामात तिळगुळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे असल्यामुळे ही परंपरा सुरु आहेतिळगुळ घ्या आणि गोड-गोड बोलामजर संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा Sapna Sawaji -
तिळगुळ वडी (til gulachi vadi recipe in marathi)
#EB9#W9#तिळगुळाचीवडीसंक्रांत जवळ आली की आपल्याला वेध लागतात ते तिळाचे लाडू आणि वड्यांचे.या वड्या किंवा लाडू खायला छान लागत असले तरी करायला ते वाटते तितके सोपे नाही. तीळ आणि गूळ इतकेच पदार्थ वापरुन या खमंग वड्या करायच्या असल्या तरी पाकाचा अंदाज येणे हे त्यातील सगळ्यात कसब लागणारे काम. कधी हा पाक खूप घट्ट होतो तर कधी खूप पातळ.चला तर मग पाहूयात झटपट सोप्या पद्धतीने मऊ तिळाची वडी कशी करायची ते...😊 Deepti Padiyar -
तिळगुळ लाडू...बिनपाकाचे (tilgul laddu recipe in marathi)
#संक्रांती_स्पेशल_रेसिपी_कुकस्नँप_चँलेंज#Cooksnap#तिळगुळ_लाडू_बिनपाकाचेतिळा!!!!रूप तुझे इवलेसे मना-मनाला जोडणारे...राग सारा विसरून गोड बोलायला लावणारे...कण जरी एकच छोटुला सात जणांनी वाटून खाल्ला...दाखला देतात त्यावरूनच एकमेकांवरच्या प्रेमाला...मायेच्या माणसास अंतरता जीव तीळतीळ तुटतो...अलीबाबाची भलीमोठी गुहा मात्र चुटकीसरशी उघडतो...हलवून डोलवून गोड पाकात रूप देतात तुला काटेरी...करुनी दाग दागिना त्याचाच लेवविती आनंदे तनुवरी....तिळा!!! तुझी नी गुळाची आहे जशी अभेद्य जोडी...तशीच समस्त नात्यांची वाढू दे जीवनात गोडी... तर असे हे मानवी जीवनातील स्नेहाचे,गोडव्याचे प्रतीक तर दुसरीकडे थंडीमध्ये शरीरात ऊब निर्माण व्हावी म्हणून केलेली आहाराची योजना..माझ्या मुलाला पाकातल्या तिळगुळ लाडवांपेक्षा बिन पाकातले मऊसूत,खमंग तिळगुळ लाडू जरा जास्तच आवडतात..पाकातले खायला कष्ट पडतात म्हणे..😏 म्हणून कधी तिळगुळ वड्या तर कधी असे लाडू करते😋 या वर्षी मी माझी मैत्रीण आणि बहीण @Sujata_Kulkarni हिची खमंग,बिनपाकाचे, मऊसूत तिळगुळ लाडू ही रेसिपी मी cooksnap केलीये..सुजाता,खूप मस्तच झालेत लाडू...छान taste आलीये 😋😋👌.. Thank you so much dear for this delicious recipe😊🌹❤️ तिळगुळ घ्या गोड गोड बोला 😊🌹 Bhagyashree Lele -
तीळ शेंगदाणा चिक्की (til shengdana chikki recipe in marathi)
#GA4 #week#18 की वर्ड चिक्की! संक्रांतीच्या मोसमात तीळ आणि शेंगदाणा कूट घालून गुळाच्या पाकात चिक्की बनविली आहे. Varsha Ingole Bele -
गोविंद लाडू (govind laddu recipe in marathi)
#KS7#लॉस्ट रेसिपीज ऑफ महाराष्ट्र# गोविंद लाडू गोविंद लाडू ही पौष्टिक आणि झटपट होणारे लाडू आहेत.खूप मस्त पारंपारिक आणि विस्मरणात गेलेली ही रेसिपी आहे. Rupali Atre - deshpande -
-
शेंगदाणा लाडू (shengdana ladoo recipe in marathi)
#thanksgiving सुजाता ताई यांची लाडू ची रेसिपी try करून पाहिली. झटपट होणारी आणि पौष्टिक अशी रेसिपी आहे. खूप छान झाले लाडू. Priya Sawant -
पारंपरिक डिंक लाडू (dink laddu recipe in marathi)
#shitalShital Muranjan यांची रेसिपी मी कूकस्नॅप केली आहे. खूप छान झाले लाडू.यात थोडा बदल केला आहे मी, त्यात पिस्ता, अंजीर, काजू, अक्रोड इ.. ड्रायफ्रूट घातले आहेत. Sampada Shrungarpure -
पौष्टिक अळीव लाडू (paushtik adiv ladoo recipe in marathi)
#GA4#week14#कीवर्ड- लाडू.अळीवाचे लाडू आपण नेहमी ,नारळाच्या पाण्यात किंवा फळांच्या रसामध्ये भिजवून करतो. पण हे लाडू फक्त ३ दिवसच टिकतात. मी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने हे लाडू तयार केले आहेत. खूपच झटपट होतात हे लाडू...😊 शिवाय महिनाभर टिकतात.अळीवाचे लाडू म्हणजे स्त्रीयांसाठी एक वरदानच आहे .अळीवामधे लोह, कॅल्शियम,फाॅलिक ,क जीवनसत्त्वासारखी पोषक घटक या अळीवामधे आहेत.रक्तशुद्धी करणाऱ्या घटकांमुळे अळीव हे, स्त्रीयांना उपयुक्त ठरते.बाळंतिणीसाठी तर हे अळीव खूपच फायदेशीर आहे. थंडीचे दिवस हे वर्षभराची ऊर्जा मिळवण्यासाठी आणि तब्येतीसाठी उत्तम मानले जातात. या काळात पौष्टिक गोष्टी खाल्ल्याने त्या अंगी लागतात. मुलांबरोबरच मोठ्यांनीदेखील या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या काळात खाल्लेल्या पदार्थाची उपयुक्तता पुढील वर्षभरासाठी पुरते.गूळ, खोबरे आणि अळिव घालून केलेले हे लाडू शरीरात उष्णता निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरतात. Deepti Padiyar -
तिळाचे लाडू(मकर संक्रांत स्पेशल) (Tilache Ladoo Recipe In Marathi)
#TGR मकर संक्रांत या सणाला तिळाचे लाडू अनेक जण बनवतात. तिळामध्ये कॅल्शियम लोह मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. त्यामुळे दात हाडे मजबूत होण्यास मदत होते.मुखवास म्हणूनही बडिशेप आणि तिळाचे सेवन करावे. आशा मानोजी -
ड्रायफ्रुट लाडू (Dryfrut Ladoo Recipe In Marathi)
#लाडू #हे लाडू हिवाळ्यात खाल्ल्याने आपल्या शरीरात उष्णता वाढते. तसेच लाडू बाळंतीण स्त्रियांना दूध येण्यास उपयोगी आहेत. Shama Mangale -
तिळाचे लाडू (tilache laddu recipe in marathi)
#मकर #तिळाचे लाडू. हा लाडू मी माझ्या सासू सासरे यांच्या साठी स्पेशल केला. हा लाडू खूप मऊ असल्या मुळे वयस्कर माणसे खाऊ शकतात. संक्रात येण्याच्या पूर्वी माझे सासरे ८४ वर्षाचे म्हणाले की जरा मऊच लाडू कर, म्हणून खास त्यांच्या साठी मी हा तीळ कुटाचे लाडू केले. गेले काही वर्षे चिक्की चा गुळ घालुन लाडू करायची. यंदा पण चिक्कीच्या गुळाचे लाडू मुलासाठी केले. पण मऊ लाडू ही केले. सासरे भारी खुश झाले आणि त्यांचा आनंद पाहून माला ही खूप समाधान वाटले. मग चालातर तुम्ही ही या रेसिपी चा आनंद घ्या. Sujata Kulkarni -
खमंग तिळगुळ पोळी (tilgul poli recipe in marathi)
#EB9#W9#गुळपोळीपारंपारिक पद्धतीने तयार करण्याती येणारी गुळपोळी आपल्या सर्वांनाच आवडते. काही खास सणांसाठी हा पदार्थ तयार केला जातो. ही गुळपोळी फक्त चवीलाच उत्तम नाहीतर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर ठरते. गहू आणि गुळापासून तयार करण्यात आलेली ही हाय फायबर पोळी शरीरामधील आयर्नची कमतरता भासू देत नाही.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
डिंकाचे लाडू (dinkache laddu recipe in marathi)
#EB4#week4थंडीमध्ये डिंकाला अतिशय महत्व असते.स्त्रियांनी तर या दिवसात डिंक , मेथी चे लाडू आशा गोष्टी खाल्याचं पाहिजे. त्यातून ऊर्जा मिळते आणि कंबर, पाय याना मजबुती मिळते kavita arekar -
तिळगुळ आणि तिळाची वडी (tilgul tilachi wadi recipe in marathi)
#EB9 #W9संक्रांत आणि तिळ, गूळ हे समीकरण इतके परफेक्ट आहे की संक्रांतीच्या दिवसात घराघरांतून तिळाच्या वेगवेगळ्या रेसिपीज केल्या जातात. तिळाच्या वड्या, तिळगुळ, गुळपोळी, तिळाची चिक्की या त्यातल्याच काही.. थंडीच्या दिवसांत या पदार्थांमुळे आपल्या शरीरात उष्णता निर्माण होते जी या ऋतूत खूपच गरजेची असते. मी आज तिळ वडी आणि तिळगुळ रेसिपी शेअर करणार आहे..Pradnya Purandare
-
तीळ गूळ पोळी (til gud poli recipe in marathi)
#मकर#तीळगूळाची पोळीमकर संक्रांत म्हंटलं कि महिलांची लगबग सुरू होते ती ओवसा, हळदी कुंकू, लुटण्यासाठी वाण आणि त्याचबरोबर तीळाची वडी, लाडू, पोळ्या वगैरे वगैरे....पण हे सर्व न थकता उत्साहाने महिला वर्ग लिलया पार पाडतो.मकर संक्रांतीच्या काळात तीळाचे सेवन करण्याला आरोग्याच्या द्रृष्टीने खूप महत्त्व आहे. म्हणूनच तीळगूळाच्या पोळीची ही रेसिपी तुमच्यासाठी. Namita Patil -
More Recipes
- तिळाची लसूण चटणी व बाजरीच्या भाकरी (teelachi lasun chutney ani bajrichya bhakhri recipe in marathi)
- तीळ गुळ लाडू (til gul laddu recipe in marathi)
- कुरकुरीत बोंबील फ्राय (kurkurit bombil fry recipe in marathi)
- तिळगुळाची कुरकुरीत पापडी (teelgulachi kurkurit papadi recipe in marathi)
- फिश फ्राय (fish fry recipe in marathi)
टिप्पण्या