उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

Rupali Kalpesh Dhuri
Rupali Kalpesh Dhuri @rupali26

#KD

उकडीचे मोदक (ukdiche modak recipe in marathi)

#KD

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास ३० मिनिटे
४ लोक
  1. 1 वाटीतांदळाचे पीठ
  2. 1 वाटीपाणी
  3. 1 टीस्पूनतुप
  4. चवीनुसारमीठ
  5. 1 वाटीखवलेला नारळ
  6. 1/2 वाटीकिसलेला गुळ
  7. बदाम, पिस्ता, चारोळी, मनुका, केशर आवडीप्रमाणे
  8. 1/4 टीस्पूनवेलची पावडर, चिमुठभर जायफळ पावडर

कुकिंग सूचना

१ तास ३० मिनिटे
  1. 1

    उकड बनविण्यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी, मीठ आणि तुप घालुन उकळवणे.

  2. 2

    पाणी उकळल्यावर त्यात थोडे- थोडे करुन तांदळाचे पीठ घालून ढवळणे. नंतर भांड्यावर झाकण ठेऊन १ वाफ काढणे.

  3. 3

    झाकण काढुन उकड एका ताटात काढून घेणे. आणि पाण्याचा हलका हात लावून मळून घेणे. मळून झाल्यावर १० ते १५ मिनीटे एका ओल्या कापडात ठेवणे.

  4. 4

    सारणा साठी एका भांड्यात १ टिस्पुन तूप गरम करणे. त्यात खवलेला नारळ, गुळ, बदाम, पिस्ता, चारोळी, मनुका, केशर, वेलची पावडर, जायफळ पावडर घालून परतणे. मिश्रण जास्त कोरडे करु नये. त्यामुळे मोदक फुटण्याची शक्यता असते.

  5. 5

    आता मळुन ठेवलेली उकडीचे १०-१२ गोळे करणे. एक गोळा घेऊन त्याला तुप किंवा पाण्याचा हात लावून पारी तयार करुन त्यात तयार केलेले सारण भरुन मोदक बनविणे.

  6. 6

    एक भांडे घेऊन त्यात थोडे पाणी ओतावे. त्यावर गाळणी ठेवावी. गाळणी मध्ये कपडा, केळीचे पान किंवा हळदीची पाने (हळदीच्या पानांनी मोदकांना वास छान येतो आणि चवीला ही छान लागतात) ठेऊन त्यावर मोदक ठेवून १०- १२ मिनिटे वाफवणे.

  7. 7

    सजावटीसाठी मोदकावर केशरची काडी ठेवावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Rupali Kalpesh Dhuri
रोजी

Similar Recipes