मऊसूत उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

मऊसूत उकडीचे मोदक (Ukadiche Modak Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ १/२ तास
६ जणांसाठी
  1. 400 ग्रॅमआंबेमोहोर तांदळाचे पीठ
  2. 1 1/2 पेलापाणी
  3. 1 1/2 पेलादूध
  4. चवीनुसारमीठ
  5. 1 टे. स्पून साजुक तूप
  6. 1 1/2खवलेला नारळ
  7. 1/4 किलोगूळ
  8. 1 टीस्पूनसाजुक तूप
  9. 1 टीस्पूनवेलची पूड
  10. केशर

कुकिंग सूचना

१ १/२ तास
  1. 1

    प्रथम एका भांड्यांत तूप घालून त्यांत खोबर व गूळ घालून छान चव तयार करून घेतला व त्यांत वेलची पूड व केशर घातले.

  2. 2

    नंतर एका भांड्यात १ १/२ पेला पाणी, १ १/२ पेला दूध मीठ व तूप घालून पाणी उकळवून घेतले व त्यांत २ १/२ पेले तांदळाचे पीठ घालून छान घोटून घेतले व झाकण देऊन ५ मिनीटे वाफ काढली.

  3. 3

    नंतर वाफवलेले पीठ छान मळून घेतले. पैकी छोटा गोळा घेऊन त्याची मोदकाची पारी तयार केली. नंतर अंगठा व त्याच्या जवळील दोन बोटांचा वापर करून पारीला कळ्या पाडून घेतल्या.

  4. 4

    नंतर तयार पारीत खोब-याचा चव भरला व सर्व पाकळ्या एकत्र केल्या. छान सुबक मोदक तयार झाला. असे मोदक करून मोदक पात्रात केळीचे पान ठेऊन त्यांत मोदक ठेवले व ५ मिनीटांसाठी वाफवून घेतले. मऊ लुसलुशीत मोदक तयार झाले. बाप्पाला नैवेद्य दाखवून गरमागरम मोदक साजुक तूपाबरोबर सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

टिप्पण्या

Similar Recipes