भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#मकर #भोगीची भाजी

भाजी आणायची म्हणजे मला तर संचारल्यासारखे होते.किती भाज्या घ्याव्यात आणि किती नकोत असेच होऊन जाते.संक्रांत म्हणली की मंडई डोळ्यापुढे येते.सुगडं,गव्हाच्या ओंब्या,ऊस,बोरं,गाजर,मटार, पावटा,विविध प्रकारच्या शेंगा,भुईमूग शेंगा किती नि काय!!

भोगी हा संक्रातीचाच एक भाग आहे.भोगी म्हणजे आनंद उपभोगणे!!दररोजच्या रहाटगाडग्यातून थोडे बाजूला होऊन आहे त्यात आनंद उपभोगायचा दिवस. स्त्रियांचे डोक्यावरुन नहाणे,बांगड्या भरणे,नटणेसजणे हे तर आहेच,पण हिरवाईने नटलेल्या भाजीपाल्याचाही मनमुराद आनंद भोजनात घेणेही अपरिहार्यच!!अशा तनामनाला आनंद देणाऱ्या भोगीचे स्वागत करण्यासाठी गृहिणी किती उत्सुक असतात!!
भोगीला सगळ्या भाज्या एकत्र करुन शिजवण्याची पद्धत महाराष्ट्रात घरोघरी पहायला मिळते.यात प्रामुख्याने वांगी,गाजरे,उसावरच्या शेंगा,वालपापडी,पावटा,मटार,ओले हरभरे अशा प्रथिनयुक्त भाज्यांचा समावेश असतो.उंधियोच्या जवळ असणारी ही भाजी बाजरीच्या भाकरीबरोबर कमाल लागते!!👍
मी केलेल्या भोगीच्या भाजीची चव तर घेऊन पहा....पुन्हापुन्हा खाते रहोगे।😋😋🤗

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिटे
5-6व्यक्ती
  1. ४-५काटे वांगी मध्यम आकाराची
  2. १ मध्यम आकाराचे गाजर
  3. १ वाटी सोललेल्या उसावरच्या शेंगा
  4. १ वाटी सोललेली वालपापडी
  5. १ वाटी पावट्याचे दाणे
  6. १ वाटी मटार दाणे
  7. १ वाटीओले हरभरे
  8. १ वाटीकोथिंबीर
  9. १ वाटीतीळकूट
  10. १ वाटीदाण्याचे कूट
  11. १ वाटीसुके खोबरे मिक्सरमधून ग्राइंड केलेले
  12. १ वाटीगूळ(अंदाजे २ टेबलस्पून)
  13. २ टीस्पूनतीळ
  14. २ टीस्पूनओवा
  15. ३ टीस्पूनगरम मसाला
  16. २ टीस्पूनमीठ अथवा चवीनुसार
  17. 5-6 टेबलस्पूनगोडेतेल
  18. २ टीस्पूनतिखट
  19. फोडणीचे साहित्य:मोहरी,हिंग,मेथ्या,हळद,
  20. १ ग्लासपाणी

कुकिंग सूचना

40मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात.वांगी व गाजराच्या मध्यम फोडी कराव्यात.शेंगा सोलून घ्याव्यात.मटार, पावटा,हरभरे यांचे दाणे काढून घ्यावेत.वरील प्रमाणानुसार लागणारे सगळे मसाला साहित्य एका ताटात तयार करावे.तसेच मिसळणाचा डबा व तेल हे जवळ ठेवावे.

  2. 2

    एक मोठीशी कढई तापत घालून त्यात तेल घालावे.तेल थोडे जास्त घातले तर भाज्यांची चव छान लागते.आवडीनुसार तेल घालावे.फोडणी तडतडली ओवा व तीळ,हळद घालावी नंतर त्यावर एकेक भाज्या घालत जाव्या.त्या चांगल्या परतून घ्याव्यात.

  3. 3

    आता सगळे मसाले,म्हणजे तीळकूट, दाण्याचेकूट,गोडा मसाला,गरम मसाला, तिखट,मीठ,गूळ,खोबरे घालावे.एक वाफ येऊ द्यावी. त्यानंतर अंदाजे पाणी घालावे.भाज्या शिजण्यासाठी. रस्सा जास्त हवा असल्यास पाण्याचे प्रमाण वाढवावे.पण फारही रसदार ही भाजी चांगली लागत नाही.थोडासाच घट्ट रस्सा असावा.१५-२०मिनिटे कढई वर झाकण घालून ठेवावे. अधूनमधून हलवावे. भाजी व दाणे शिजण्यास वेळ लागतो.बोटाने भाजी,दाणे शिजलेत का ते पहावे व त्यानुसार गँस बंद करावा. वरुन चिरलेली कोथिंबीर घालावी.भोगीची भाजी तयार आहे!!गरम भाकरी बरोबर सर्व्ह करावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes