भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
Badlapur

#EB9
#W9
#भोगीचीभाजी

मकरसंक्रांत ही हिवाळ्यात येते. हिवाळ्यात हवेत खूप गारवा असतो. अशा वातावरणात शरीराला उर्जा मिळण्यासाठी पुरेशा उष्णतेची गरज असते. यासाठीच सणाला भोगीची भाजी घरोघरी तयार केली जाते. हिवाळ्याच्या काळात मिळणाऱ्या सर्व ताज्या भाज्यांचा वापर भोगीच्या भाजीत केला जातो. या भाजीत विशेषतः वांगे, गाजर, हरभरा, घेवडा, तीळ आणि शेंगदाण्यांचा वापर केला जातो. आयुर्वेदानुसार या भाज्या खाण्यामुळे शरीरात उष्णता निर्माण होते. ज्यामुळे शरीराला पुरेशी उब आणि ऊर्जा मिळते. बाजरी हे धान्यदेखील उष्ण आहे. म्हणूनच फक्त थंडीच्या काळातच बाजरीची भाकरी खाल्ली जाते. शिवाय भोगीच्या मिक्स भाजीसोबत ही भाकरी अगदी चविष्ठ लागते. भोगीला बाजरीची भाकरी करताना वरून तीळदेखील लावले जातात. हिवाळ्यात धनधान्य मुबलक प्रमाणात उपलब्ध असतं शिवाय याकाळात तुम्हाला प्रचंड भुक लागते. यासाठीच भोगीला ही भाजी आणि भाकरी खाल्ल्यास शरीराला चांगला फायदा होतो.
चला तर मग पाहूयात रेसिपी...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
४ ते ५ जणांसाठी
  1. 1/4 किलोमटार
  2. 2वांगी फोडी
  3. 1बटाटा फोडी
  4. 10-12 घेवड्याच्या शेंगा
  5. 1/4 कपपावटा
  6. 1/4 कपगाजराचे काप
  7. 1/4 कपतुरीचे दाणे
  8. 5-6 गवारीच्या शेंगा
  9. 1/2 कपफ्लाॅवरचे तुकडे
  10. 1/4 कपभिजवलेले शेंगदाणे
  11. 4बोरं
  12. शेवग्याच्या शेंगा आवडीनुसार
  13. 2कांदे उभे चिरून
  14. 1/2सुके खोबरे
  15. 1/4 कपपांढरे तीळ
  16. लाल तिखट आवडीनुसार
  17. 1/2 टीस्पूनहळद
  18. 1 टीस्पूनगरम मसाला
  19. जीरे ,हिंग
  20. मीठ चवीनुसार
  21. तेल फोडणीसाठी
  22. कोथिंबीर बारीक चिरून
  23. गूळाचा खडा
  24. 1 टेबलस्पूनशेंगदाणे कूट
  25. 6-7 लसूण पाकळ्या
  26. 1 टेबलस्पूनआलं

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    भाज्या निवडून, चिरून पाण्यात भिजत ठेवा.

  2. 2

    पॅनमधे कांदा,खोबरे, लसूण,आलं,तीळ भाजून त्याचे बारीक वाटणे वाटून घ्या.

  3. 3

    कढईत तेल गरम करून त्यात जीरे,वाटलेला मसाला घालून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्या.

  4. 4

    नंतर वरील सर्व मसाले घालून,मीठ घालून परतून घ्या.नंतर त्यात भाज्या घालून छान मिक्स करून घ्या. गरजेनुसार पाणी घालून भाजी शिजवून घ्या.

  5. 5

    भाजी शिजत आली की त्यात गूळ, शेंगदाणे कूट घाला‌. शूवटी कोथिंबीर घालून भाकरीसोबत सर्व्ह करा‌.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepti Padiyar
Deepti Padiyar @deepti2190
रोजी
Badlapur
I'm passionate about Cooking, Baking & Chocolates Making..😊I love nature , traveling ,reading , drawing and love food photography..😊
पुढे वाचा

Similar Recipes