भोगीची भाजी (bhogi chi bhaji recipe in marathi)

Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
मुंबई

#मकर
#भोगीचीभाजी
#mixveg
#मिक्सवेज

आपला भारत देश हा कृषिप्रधान देश आहे आपले जनजीवन हे सगळे शेतात होणाऱ्या फळ, भाज्या धान्य यांवर अवलंबून आहे. जेवढी राज्य तेवढे प्रकार तेवढी खाण्यापिण्याची संस्कृती प्रकार सगळीकडे एकच ज्या ज्या राज्याच्या भागात जे काही उगवते, पेरते तेच खाद्य पदार्थ रोजच्या आहारात समावेश होतात. भोगी, संक्रांत कॅलेंडर प्रमाणे वर्षाचा पहिला सण भोगी संक्रांत, सण आणि त्याचा साजरा करण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी हा मोठ्या उत्साहाने भारताच्या प्रत्येक राज्यातून साजरा केला जातो, कोणी पोंगल कोणी बिहू कोणी लोहरी कोणी उत्तरायण ही सगळी एकाच सणाची नावे आहे की वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या राज्यात साजरी केली जातात , ज्या ज्या राज्यात जी फळ धाने कडधान्य हिवाळ्यात पीक म्हणून येतात ते सगळे आहारात समावेश करतात, महाराष्ट्रात भोगीची भाजी
ही भोगीच्या दिवशी बनविले जाते, सगळ्या प्रकारची धान्ये भाज्या शेंगा सगळे प्रकार टाकले जातात, हाच प्रकार बाकीच्या राज्यांमध्येही बनवला जातो त्यांची नावे वेगळी असतात कोणी अवियल म्हणतात तर उंधियो, कोणी शुकतो ही सगळी मिक्स भाज्यची नावे आहे बनवण्याची पद्धत आणि घटक वेगळे असतात पण संक्रांतीच्या वेळेस हे बनविले जातात नववर्षाच्या पहिला सण सगळीकडे उत्साहाने साजरा केला जातो,
भोगीची भाजी भोगी या नावातच तिचा अर्थ दडलेला आहे, भोग म्हणजे नैवेद्य देवाला आपण अर्पण करतो तिळाचे फोडणी देऊन ही भाजी बनवली जाते बऱ्याच प्रकारच्या भाज्या वापरल्या जातात वेगवेगळ्या प्रकारच्या फोडणी देऊन ही भाजी बनवली जाते. आपल्या आवडीनुसार भाज्यांचे प्रमाण कमी जास्त करता येते, थोड्या-थोड्या भाज्या करून ही भरपूर प्रमाणात ही भाजी तयार होते, या भाजीला 'लेकुरवाळी 'भाजी ही म्हणतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1 तास
6 /7 व्यक्ति
  1. 4बटाटे
  2. 250 ग्रामपांढरी वांगी
  3. 1/4 कपएक भाजी प्रमाणे या भाज्या तयार करून घ्यायच्या गाजर, हरबरा,पावटा, मटार,तुरीचेदाणे, फ्रेंचबिन्स
  4. 250 ग्रामवाल पापडी
  5. 2शेवगाच्या शेंगा
  6. 3 टेबलस्पूनतेल फोडणीसाठी
  7. 2 टेबलस्पूनजीरे मोहरी
  8. 1 टेबलस्पूनआखे तीळ
  9. 1/4 टीस्पून ओवा
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. वाटण मसाला साठी
  12. 4हिरव्या मिरच्या
  13. 3लाल सुक्या मिरच्या
  14. 1आल्याचे तुकडे
  15. 2 टेबल्स्पूनशेंगदाणा कूट
  16. 2 टेबलस्पूनतिळाचे कूट
  17. 2 टेबल्सस्पूनखोबर्‍याचे किस
  18. 5 टेबलस्पूनतेल वाटण ग्रेव्हीसाठी
  19. 4मोठे लाल टमाटे कट केलेले
  20. मीठ स्वादानुसार
  21. 2 टेबलस्पूनलाल मिरची पावडर
  22. 2 टेबलस्पूनधणे-जीरे पावडर
  23. 2 टेबलस्पूनगरम मसाला
  24. 2 टेबलस्पूनगोडा मसाला
  25. 1 टेबलस्पूनहळदी पावडर

कुकिंग सूचना

1 तास
  1. 1

    वाटन मिक्सर पॉट मध्ये तयार करून घेऊ, थोडे पाणी टाकून वाटनाची चांगली पेस्ट करून घ्यायची

  2. 2

    सगळ्या भाज्या धून कट करून सोलून तयार करून घेऊ. फोडणीची तयारी करून घेऊ

  3. 3

    मोठ्या कढईत तेल टाकून राई, जीरे,तीळ, ओवा, हिंग टाकून घेऊन थोडीशी हळद,लाल मिरची टाकून घेऊ

  4. 4

    आता फोडनीवर सगळ्या भाज्या टाकून घेऊ व्यवस्थित फ्राय करून घेउ फ्राय करताना थोडे मीठ टाकून घेऊ, भाज्या चांगल्या तेलात फ्राय करून तेलात वरच वाफ काढून घेऊ वरून झाकण ठेऊन वाफ काढून घेऊ. पाणी घालून भाज्या शिजवून घेउ

  5. 5

    वाटण्याच्या ग्रेव्हीसाठी दुसऱ्या कढईत पाच टेबलस्पून तेल टाकून घेऊ तेल गरम झाल्यावर वाटणा ची पेस्ट टाकून घेऊ, वरती खोबरा किस टाकून घेऊ, चमच्याने ग्रेव्ही फ्राय करून घेऊ

  6. 6

    ग्रेव्ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे त्याला तेल सुटले म्हणजे समजायचे तळून झाली आहे आता त्यात कट केलेला टोमॅटो टाकून घ्यायचा थोडे मीठ टाकून टोमॅटो ग्रेव्हीत व्यवस्थित दाबून फ्राय करून घ्यायचे आहे

  7. 7

    टोमॅटो व्यवस्थित ग्रेव्हिस स्मॅश करून फ्राय करून घ्यायचा आहे, टोमॅटो फ्राय झाल्यावर दिल्याप्रमाणे मसाले मीठ टाकून घेऊ मसाले ग्रेव्हीत व्यवस्थित मिक्स करून ग्रेव्ही व्यवस्थित शिजवून घेऊ

  8. 8

    आता ग्रेव्हीत पाणी टाकून घेऊ ग्रेव्ही उकळून झाल्यावर तयार ग्रेव्ही शिजलेल्या भाजीवर टाकून घेऊ भाजी व्यवस्थित मिक्स करून एक जीव करून परत एकदा शिजुन घेऊ भाजीला छान कलर येतो आणि टेस्ट ही छान होतो तुम्हाला टेस्टमध्ये वाटल्यास चिंचे चा कोळ, गुळ टाकू शकतात

  9. 9

    तयार आपली भोगीची भाजी भाकरी,तिळाची चटणी, तिळाची चिक्की, लाडू बरोबर सर्व करू

  10. 10

    भोगीचे जेवणाचे ताट तयार आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Chetana Bhojak
Chetana Bhojak @chetnab_26657014
रोजी
मुंबई
Cooking is an art which touches heart and lives across the globe with all mankind.Follow my page on Instagram_cuisine _culture _
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes