कुरकुरीत तीळ वडी (til vadi recipe in marathi)

Trupti Patil
Trupti Patil @cook_28225561

#KD
या पध्दतीने तीळ वडी केली तर अजिबात बिघडत नाही.
थंडीत खाण्यासाठी उत्तम ...

कुरकुरीत तीळ वडी (til vadi recipe in marathi)

#KD
या पध्दतीने तीळ वडी केली तर अजिबात बिघडत नाही.
थंडीत खाण्यासाठी उत्तम ...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिट
4 सर्व्हिंग्ज
  1. 200 ग्रॅमभाजलेले तीळ
  2. 200 ग्रॅमगूळ
  3. 2 चमचेतूप

कुकिंग सूचना

15 मिनिट
  1. 1

    कढईत गूळ घालून मंद आचेवर ठेवून एकसारखे हलवा.

  2. 2

    गूळाला फेस आल्यावर एका वाटीत पाणी घेऊन पाकाचा एक थेंब पाण्यात टाका मग तो कडक झाला पाहिजे म्हणजे पाक तयार.

  3. 3

    आता गॅस बंद करून तीळ घालून हलवा.

  4. 4

    लाटणे व पोळपाट ला तूप लावून पातळ लाटून घ्यावे.

  5. 5

    लगेचच भाऊलीच्या भोवती लावा.

  6. 6

    लगेच कडक होते आणि तुटण्याची भिती असते.म्हणून कडक वाटत असेल तर हेअर ड्रायर वापरून मऊ करून पाहीजे तो आकार देता येईल.

  7. 7

    उरलेले च्या वड्या पाडा.

  8. 8

    अशाप्रकारे तीळ वडी व भाऊली तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Trupti Patil
Trupti Patil @cook_28225561
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes