समोसे (samosa recipe in marathi)

Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391

#GA4 #week21#samosa

समोसे (samosa recipe in marathi)

#GA4 #week21#samosa

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

1/2  तास
2-3 जणांसाठी
  1. 1+1/4 कप मैदा
  2. 1/2 कपहिरवा वाटाणा(भिजवून घेतलेले)
  3. 6-7 लहानबटाटे
  4. 1/2 टीस्पूनजीरे
  5. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  6. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  7. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  8. 1 टीस्पूनधणे- जीरे पावडर
  9. तेल तळण्यासाठी
  10. मीठ चवीनुसार

कुकिंग सूचना

1/2  तास
  1. 1

    मैदा वाटी मध्ये घेऊन तेल, मीठ, जीरे किंवा ओवा घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. 20-25 मिनीटे झाकून ठेवावे.

  2. 2

    भिजवून घेतलेले वाटाणा व बटाटे कुकरमध्ये 2-3 शिट्या देऊन शिजवून घ्यावेत.

  3. 3

    कढईत तेल गरम करून कांदा परतून घ्यावा.त्यावर वाटाणा व उकडलेले बटाटे स्मॅश करून घालावे व लाल तिखट,गरम मसाला, धणे-जीरे पावडर, मीठ घालून परतावे. कोथिंबीर घालून भाजी करून घ्यावी.

  4. 4

    मळून घेतलेल्या पीठाचे गोळे करून घ्यावेत. एक गोळा घेऊन लांबट आकारात लाटावा.त्याचे सुरीने कापून दोन भाग करून घ्यावेत. अशा प्रकारे एका गोळ्याचे दोन समोसे बनतात.

  5. 5

    यामधील एक भाग घेऊन समोसा चा आकार द्यावा. कडा दोन्ही बाजूंनी दुमडून थोडे पाणी लावून बंद करून घ्यावे. त्यामध्ये तयार भाजी स्टफ करावी.

  6. 6

    वरून कडांना पाणी लावून बंद करून घ्यावे. अशा प्रकारे सर्व समोसे तयार करून घ्यावेत.

  7. 7

    समोसे मिडियम गॅसवर तळून घ्यावेत. गरम समोसे चटणी व साॅस बरोबर सर्व्ह करावेत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Priya Sawant
Priya Sawant @cook_21069391
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes